दि. १६.११.२०२३
क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी बांधवांचे प्रेरणास्थान
- रायपूर (कारवाफा) येथे आदिवासी जननायकांच्या पुतळ्यांचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण
- सल्लागागरा,विर बाबूरावजी शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यांचे लोकार्पण
- आमदार डॉ. देवरावजी होळी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
रायपूर (कारवाफा) येथे कार्यक्रमाचे भव्य आयोजन
- आदिवासी पारंपारिक सांस्कृतिक नृत्याने अतिथिंचे स्वागत
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांनी विरुद्ध लढलेली लढाई ही सर्व आदिवासी बांधवांसाठी अत्यंत स्फूर्तीदायी असून बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मोजा रायपूर येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या निमित्ताने आयोजित वीर बाबुराव शेडमाके, सल्लागागरा,भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यांच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी केले.
याप्रसंगी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आमदार कृष्णाजी गजबे सुभाष वळधा ग्रामसभा अध्यक्ष, प्रमोद पिपरे, विलासराव दशमुखे, मारोतराव इचोडकर, सुरेश शहा, दिपक वासेकर, रामरातन गोहणे, दिलीप चलाख, हेमंत बोरकुटे विनोद पेशंट्टीवर, जयराम चलाख, रामचंद्र वारवाडे, भोजराज भगत, प्रतीक राठी, विलास चरडुखे, यश गाण्यारपवार,, यांचे सह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे मुळगाव मौजा रायपुर येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सल्लागागरा ,वीर बाबुराव शेडमाके व भगवान बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार डॉ. देवरावजी होळी आमदार कृष्णाजी गजबे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
रायपूर सारख्या अतिशय लहान गावांमध्ये कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे आयोजन नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. अतिथींचे स्वागत आदिवासी पारंपारिक सांस्कृतिक नृत्याने करण्यात आले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये परिसरातील आदिवासी बांधवांनी उपस्थिती दर्शविली.