दि. ५ नोव्हेंबर २०२३
गडचिरोली शहरात विकास कामांचा धडाका असाच सुरू राहणार; आमदार डॉ. देवरावजी होळी
- गडचिरोली शहरात आ. डॉ.देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांतून विकास कामांचा धडाका
- रामनगर येथे ८० लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या विशेष प्रयत्नातून गडचिरोली शहरांमध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू असून हा विकासाचा धडाका असा सुरू राहणार असून शहराच्या विकासासाठी पुन्हा मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी रामनगर येथे ८० लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.
या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार देवरावजी होळी यांचे शुभ हस्ते तर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, शहराचे अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, महीला मोर्चाच्या शहराच्या अध्यक्ष कविताताई उरकूडे, आदिवासी आघाडीच्या नेत्या वर्षाताई शेडमाके शहराचे महामंत्री माजी नप सभपाती केशव निंबोळ, माजी नगरसेविका लताताई लाटकर, भावनाताई हजारे (कुळमेथे), देवाजी लाटकर, शेख भाई, विलास नैताम, घनश्यामजी मस्के, चंद्रभान गेडाम, हर्षल गेडाम, बोबाटे काकाजी, गेडाम साहेब, निरनशहा मसराम, प्राध्यापक उराडे, सेवानिवृत्त बिडीओ मडावी साहेब, विजय शेडमाके, श्याम वाढई, यांचे सह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन करण्यात आलेल्या कामांमध्ये रामनगर येथील वार्ड क्रमांक २० मधील श्री हजारे आटा चक्की यांच्या घरापासून रायपुरे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम करणे १० लक्ष , श्री सुरेश भोयर ते पुंजीराम कोवे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम करणे १० लक्ष, श्री अरुण गेडाम ते गावडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम करणे १० लक्ष रुपये, फजल शेख ते रामटेके यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम करणे १० लक्ष रुपये, श्री नरोटे ते रॉय यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड १० लक्ष रुपये, श्री उईके बाबू ते भास्कर मस्के यांच्या घरापर्यंत सिमेंट रोडचे बांधकाम करणे १० लक्ष रुपये, तर श्री चंद्रभान गेडाम ते शेटे सर १० लक्ष रुपये व श्री ऊईके बाबू ते भोयर यांचे घरापर्यंत सिमेंट रोड १० लक्ष रुपये या कामांचे लोकार्पण करण्यात आले.
रामनगर मधील झालेले धडाकेबाज विकास कामे बघून शहरातील पदाधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.