शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.!

दि. २१.११.२०२३ 
Vidarbha News India
शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक, उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) अंतर्गत शासनाच्या निर्देशानुसार खरीप पणन हंगाम २०२३-२४ साठी दि. ०१ ऑक्टोबर २०२३ ते दि. ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत धान विक्री करीता शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली असून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक, उप प्रादेशिक कार्यालय, अहेरी (उच्च श्रेणी) मार्फत मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा हया ५ तालुक्यामध्ये खरेदी केंद्र अहेरी, बोरी, कमलापुर, वेलगुर, इंदाराम, उमानुर, आलापल्ली, पेरमिली, जिमलगट्टा, देचलिपेठा, मुलचेरा, सिरोंचा, झिंगानुर, असरअल्ली, अमरादी, अंकिसा, वडधम, पेंटीपाका, जाफ्राबाद, रोमपल्ली, बामणी, विठ्ठलरावपेठा, भामरागड, लाहेरी, ताडगांव, कोठी, मन्नेराजाराम, एटापल्ली, गट्टा, तोडसा, घोटसुर, जारावंडी, गर्देवाडा, व महामंडळाचे खरेदी केंद्र कसनसुर, एटापल्ली असे आ.वि.का.सह.संस्थाचे ३३, उपकेंद्र ०३, महामंडळाचे ०२ व महामंडळाचे उपकेंद्र ०१ असे एकूण ३९ खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. कोटमी / हालेवारा परीसरातील शेतकऱ्यांनी महामंडळाचे खरेदी केंद्र कसनसुर येथे आणि गेदा येथील परीसरातील शेतकऱ्यांनी महामंडळाचे खरेदी केंद्र एटापल्ली येथे तसेच गट्टा येथील शेतकऱ्यांनी आ.वि.का.सह. संस्था गर्देवाडा येथे व उडेरा येथील शेतकऱ्यांनी आ.वि.का.सह. संस्था हेडरी येथे जाऊन खरीप पणन हंगाम २०२३-२४ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी. 
तसेच खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये धान विक्री साठी शेतकऱ्यांनी त्यांच्या लगतच्या आ.वि.का सह संस्थाच्या खरेदी केंद्राशी संपर्क साधून दि. ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे करिता सातबारा, आधारकार्ड, नमुना ८ अ चालू बँक पासबुक व इतर आवश्यक दस्तावेज घेऊन स्वतः हजर राहून ऑनलाईन नोंदणी करून शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. असे उप प्रादेशिक व्यवस्थापक अहेरी (उच्च श्रेणी) यांनी कळविले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->