मलेझरी येथील सौ.शैलाताई मारोती कोहोळे या कॅन्सर ग्रस्त महिलेला मिळाला आधार - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

मलेझरी येथील सौ.शैलाताई मारोती कोहोळे या कॅन्सर ग्रस्त महिलेला मिळाला आधार

दि. २१.११.२०२३ 
Vidarbha News India 
मलेझरी येथील सौ.शैलाताई मारोती कोहोळे या कॅन्सर ग्रस्त महिलेला मिळाला आधार
- माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून आर्थिक मदत
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली :  जिल्ह्याचे विकास पुरुष आणि दानशूर राजे म्हणून सुपरिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अम्ब्रिशराव आत्राम हे आपल्या क्षेत्रातील जनतेला नेहमीच मदतीचा हात देत असतात आणि आपल्या मतदार संघातील गोर-गरीब व रोगाने ग्रासलेल्या आणि अडचणीत असलेल्या जनतेला नेहमीच आर्थिक मदत करीत असतात. त्यांनी आज सुध्दा मूलचेरा तालुक्यातील अडपल्ली (माल)ग्रामपंचायत अंतर्गत मलेझरी येथील रहिवासी असलेली सौ.शैलाताई मारोती कोहोळे ही महिला अनेक दिवसांपासून कॅन्सर या रोगाने ग्रस्त आहेत आणि उपचार करण्यासाठी आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने त्यांच्या कुटूंबात आर्थिक समस्या निर्माण झाली होती,पण ही कोहोळे कुटुंबाची ही आर्थिक समस्या राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पर्यंत कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिली.त्यावेळी राजे साहेबांनी कोहोळे कुटूंबाला आर्थिक मदत केली. सर्वतोपरी पुन्हा सहकार्य करण्याचे आश्वासन शैलाताई कोहोळे यांच्या कुटूंबाला यावेळी त्यांनी दिले.
यावेळी भाजपचे कार्यकर्ते अरुण भाऊ शेडमाके आणि कोहळे कुटुंबातील सदस्य मारोती कोहोळे हे उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->