दि. २२.११.२०२३
आदिवासींचे धर्मांतरण रोखण्यासाठी धर्मांतरण विरोधी कायद्याची नितांत आवश्यकता ; - आ. डॉ. देवरावजी होळी
- आदिवासींचे धर्मांतरण होण्याला काँग्रेसच जबाबदार
- नागपूर येथील डी लिस्टिंग महामेळाव्यामध्ये केले जनतेला आवाहन
- नागपूर येथे जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने डी लिस्टिंग महामेळाव्याच्या आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : ज्या आदिवासिंनी आपल्या रूढी ,परंपरा, पुजापद्धती, देवीदेवतांचा त्याग करून धर्मांतर करुन इतर धर्मामध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्यांना आदिवासी समाजाच्या कोणत्याही प्रकारच्या सोयी सवलतीचा लाभ देण्यात येऊ नये. त्यांना आदिवासी सूची मधून कमी (डीलिस्टिंग) करण्यात यावे. आदिवासी बांधवांचे धर्मांतर रोखण्यासाठी तातडीने धर्मांतरण विरोधी कायदा आणावा आमदार अशी मागणी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी नागपूर येथील डी लिस्टिंग महामेळाव्यामध्ये केले.
७० वर्षाच्या काँग्रेस सरकारांच्या काळात संपुर्ण देशात आदिवासींचे धर्मांतरण मिशनऱ्यांच्या माध्यमातुन मोठया प्रमाणावर करण्यात आले. त्यांना मोठे संरक्षण त्या काळातील सत्ताधाऱ्यांनी दिले. त्यामुळे आदिवासींचे धर्मांतरण होण्याला मूलतः काँग्रेसच जबाबदार आहे. त्यामूळे आदिवासी बांधवांनी त्यांच्यापासून सावध होण्याची आवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले.
नागपूर येथे जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने डी लिस्टिंग महामेळाव्याच्या आयोजन करण्यात आले या मेळाव्याला विदर्भातील आदिवासी आमदार, खासदार, विविध संघटनेच्या आदिवासी नेत्यांनी ,पदाधिकाऱ्यांनी व आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शविली.