दि. 22.11.2023
Vidarbha News India
राज्यात कडाक्याची थंडी; मराठवाड्यात मध्य व हलक्या स्वरुपाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज.!
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : मराठवाड्यात 24 ते 30 नोव्हेंबरदरम्यान मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामानाचा अंदाज मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. यामुळे पिकाच्यादृष्टीने काळजी घेण्याचा कृषी सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे.
(Severe cold in the state; Medium and light rainfall in Marathwada, Meteorological Department forecast)
देशातील अनेक भागांत आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावासाचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. केरळ , माहे, अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलवरील वेगळ्या ठिकाणी लक्षणीय पावसाची नोंद झाली आहे. केरळमध्ये कोझिकोड, तिरुवनथपुरम, कोट्टायम, इडुक्की, त्रिशूर तर तामिळनाडूमध्ये नागपट्टिनम, थुथुकुडी, कराईकल या भागात आजही पावसाची शक्यता आहे.
देशभरात हुडहुडी
देशभरातील हवामानात घट झाली आहे. थंडीचा जोर वाढला आहे. छत्तीसगड, तेलंगणा, रायलसीमा, किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश बहुतांश ठिकाणी तापमान घसरल्याने लोक शेकोटीचा आधार घेत आहेत.
झारखंड आणि आसाम आणि मेघालयमध्ये अनेक ठिकाणी, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारमधील तापमानातही घट झाली आहे. जम्मू- काश्मीरसह हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीची शक्यता आहे. गोवा, केरळ, तामिळनाडू, पुड्डुचेरी, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही धुक्याची चादर पसरली असून थंडीचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रासह इतर भागातील तापमानात घट झाली आहे. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा वाढला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. आज आणि उद्या तामिळनाडू आणि केरळमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कर्नाटकमध्ये 22 आणि 23 नोव्हेंबर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी दाट धुक्याची चादरही यला मिळणार आहे.