दि. ३.११.२०२३
गडचिरोली : केंद्र स्तरीय क्रिडा स्पर्धेत चमकले ताडगावचे विद्यार्थी.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील संत रामदयाल अनुदानित आश्रम शाळा, चिचोडा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा ०१ ते ०३ नोव्हेंबर या कालावधीत पार पडले. केंद्र स्तरीय क्रिडा स्पर्धेत शासकीय आश्रम शाळा ताडगाव येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
क्रीडा स्पर्धेत ताडगाव केंद्रतील ४ शाळा सहभागी झाले होते त्यात शासकीय आश्रमशाळा ताडगाव, शासकीय आश्रमशाळा कोठी, अनुदानीत आश्रमशाळा चिचोडा, अनुदानीत आश्रमशाळा मन्नेराजाराम येथील अंदाजे २०० ते २५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक खेळ आयोजित करण्यात आले. त्यामध्ये धाव, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, रीले, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी इत्यादी खेळांचा सहभाग होता.
ताडगावचा संघ १७ वर्षाखालील मुली व्हॉलिबॉल सामन्यामध्ये प्रथम, १७ वर्षाखालील मुली हॅण्डबॉल सामन्यामध्ये प्रथम, १४ व १७ वर्षाखालील मुली कबड्डी सामन्यामध्ये प्रथम, १७ वर्षाखालील मुले हॅण्डबॉल सामन्यामध्ये प्रथम व १७ वर्षांखालील मुले रीले मध्ये प्रथम आला. वैयक्तिक सामन्यांमध्ये निकेश राजु पिडसे उंच उडी मध्ये प्रथम, रोहित पापी मडावी गोळा फेक मध्ये प्रथम, कु. कविता कुम्मा मडावी भाला फेक मध्ये प्रथम, रोहित पापी मडावी २०० मीटर व १५०० मीटर मध्ये प्रथम, अर्जुन पत्रू मडावी ३००० मीटर मध्ये प्रथम, रोहित भगवान वेलादी ५००० मीटर मध्ये प्रथम, कु. सरिता पांडू मडावी ६०० मीटर मध्ये प्रथम, कु. सुलभा चैतू गावडे ८०० मीटर मध्ये प्रथम, कु. राधा झुरु आत्राम १५०० मीटर मध्ये प्रथम, कु. कविता कुम्मा मडावी ३००० मीटर मध्ये प्रथम, कु. दिक्षा ईश्वर वेलादी ५००० मीटर मध्ये प्रथम आले.
ताडगावतील विद्यार्थी अभ्यासासोबत क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर आहेत हे पुन्हा एकदा आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिचोडा येथील स्पर्धेत दाखवून दिले. या सर्व विद्यार्थ्याचे शासकीय आश्रम शाळा ताडगाव येथे आगमन होताच मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचा जल्लोषात स्वागत केले.