दि. 25.11.2023
आधारविश्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा 'गीता हिंगे' दिल्ली येथे रिअल लाईफ हिरो पुरस्काराने सन्मानित.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे यांनी आधारविश्व फाऊंडेशन च्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात केलेल्या सामाजिक कार्यामुळे जिल्ह्यात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कोरोना काळात तर त्यांनी त्यांच्या टीमला सोबत घेऊन केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. आणि दिल्ली येथिल पंचतारांकित रॅडिसन ब्लू हॉटेल मध्ये त्यांना रियल लाईफ हिरो हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून टांझानिया च्या हाय कमिशनर अनिसा कपूफी एमबेगा होत्या. तर विशेष अतिथी न्यू दिल्ली एनडीएमसी( मुन्सिपल कौन्सिल) चे डायरेक्टर चेल्लय्या सेल्लामुथु होते. विशेष अतिथी म्हणून रशिया च्या प्रतिनिधी एलिझावेटा निकीटीना होत्या. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या मान्यवराना रियल लाईफ हिरो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आनंदाची बाब म्हणजे या मधून गीता हिंगे यांची टॉप 50 मध्ये निवड झाली. हि गडचिरोली साठी अतिशय अभिमानाची बाब आहे. या पुरस्कारामुळे सर्व स्तरावरुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.