दि. 25.11.2023
मोटार सायकलची समोरा समोर धडक एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी.!
◆ घोट - चामोर्शी मार्गावरची घटना.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली:
प्रतिनिधी/चामोर्शी : घोट-चामोर्शी मार्गावर दोन मोटार सायकल ची समोरा समोर धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. तर एक गंभीर झाल्याची घटना आज २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घोट वरून ३ ते ४ किलोमीटरच्या अंतरावर घडली.
नित्यानंद बिस्वास वय ५५ वर्ष राहणार गोविंदपूर तालुका मुलचेरा असे अपघातात मृत्यू झाल्याचं नाव असून अशोक नारायन खोब्रागडे वय ५० वर्ष राहणार माडे मुधोली टोला असे गंभीर जख्मी झालेल्याचे नाव असुन हे जि. प. प्राथमिक शाळा मकेपल्ली येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते चामोर्शी येथे राहतात तर कल्पना शेखर बेपारी वय ४५ वर्ष राहणार विक्रमपूर तालुका चामोर्शी हे किरकोळ जख्मी झाले आहेत. नित्यानंद बिस्वास हे आपल्या MH ३३ P ४८९१ होन्डा कंपनी च्या गाडीने चामोर्शी वरून घोट कडे येत होते, तर अशोक खोब्रागडे हे आपल्या MH ३३ H ८९ ४७ हीरो फॅसन प्रो गाडीने घोट कडुन चामोर्शी कडे जात होते. अपघाताची माहीती घोट पोलीस मदत केंद्राला दिली असता पीएसआय साळूंखे, पीएसआय जनार्धन काळे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन जखमींना चामोर्शी येथे रवाना केले.