दि. 29.11.2023
गोंडवाना विद्यापीठात व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न.!
- भारतीय राज्यघटना सोशल डॉक्यूमेन्ट आहे ; श्रीमंत माने
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली.या देशाला आपण काय देतो. याचा विचार आपण करत नाही.भारतात विविधतेतून एकता आहे.इतक्या भाषा , इतके प्रांत यांची वाटचाल कशी झाली
याचा खोलात जाऊन आपण कधी विचार करतोय काय ,
स्वातंत्रासाठी अनेक हुतात्मे लढले पण त्यांची आपल्याला किंमत नाही. समाजातील
सगळ्या बाबींचा तुलनात्मक अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली.स्वातंत्र, समता, बंधुता ही त्रिसूत्री आपल्याला घटनेने दिली.मतदानाचा समान अधिकार
दिला. त्यासाठी आपण कृतज्ञ असायला पाहिजे.संविधानाने जगाकडे पाहण्याची दृष्टी दिली .
राजघटनेच्या अमृत महोत्सवा निमित्त आपण स्मरण करू असे हे सोशल डॉक्युमेंट आहे असे प्रतिपादन नागपूर येथील लोकमतचे संपादक श्रीमंत माने यांनी केले.गोंडवाना विद्यापीठात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रा तर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून
'राज्यघटनेने सामान्य भारतीयांना काय दिले?' या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. तसेच त्यांनी स्वातंत्र्य पूर्व काळातील शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सती प्रथा, या विषयांवर प्रकाश टाकला.
या प्रसंगी संविधानाची उद्देशिका आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांनी वाचन केले. अध्यक्षस्थानी प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे तर विशेष उपस्थिती म्हणून कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, मानवविज्ञान विदयाशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली, अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. दिलीप बारसागडे, लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक आनंद डेकाटे उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या प्रमाणात वाचन केले होते त्या आधारावर प्रत्येक मुद्दा न मुद्दा त्यांनी स्पष्ट केलाय. राज्यघटना आजही आपण समजून घेत नाही. आपण जी संविधानाची उद्देशिका वाचतो ती समजून घेतली पाहिजे. तरच या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचा उपयोग होईल असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीप बारसागडे, संचालन मराठीचे स. प्रा. डॉ. हेमराज निखाडे तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या समनव्यक डॉ. प्रीती काळे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.