दि. २४.११.२०२३
गोंडवाना विद्यापीठात एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा केंद्रातर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी, सकाळी ११.३० वासता, 'राज्यघटनेने सामान्य भारतीयांना काय दिले?' या विषयावर एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून लोकमतचे संपादक(नागपूर विभाग) श्रीमंत माने, प्रमुख अतिथी म्हणून लोकमत (नागपूर विभाग) वरिष्ठ उपसंपादक आनंद डेकाटे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, विशेष उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, राहणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी केले आहे.