दि. 24.11.2023
पोलीस कल्याण बहुउद्देशिय सभागृह नुतनीकरण व सरस्वती विद्यालय प्रि-स्कूलचे उद्घाटन समारंभ संपन्न.!
- मा. अपर पोलीस महासंचालक सा. यांच्या उपस्थितीत पार पडला पोलीस मुख्यालय येथील “पोलीस कल्याण बहुउद्देशिय सभागृह नुतनीकरण व सरस्वती विद्यालय प्रि-स्कूलचे उद्घाटन समारंभ”
- मा. पोलीस उपमहानिरीक्षक श्री. संदिप पाटील सा. यांची उपस्थिती.!
- पोलीस जवानांशी संवाद साधत जाणून घेतल्या त्यांच्या समस्या.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेला प्रत्येक पोलीस अधिकारी व जवान हा शारीरिक दृष्ट¬तंदुरुस्त राहावा तसेच त्यांची खेळाप्रती आवड निर्माण व्हावी व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड व्हावी तसेच त्यांच्या पाल्यांना लहान वयातच शिक्षणाची आवड निर्माण होऊन खेळाच्या माध्यमातून त्यांची चांगली प्रगती व्हावी यासाठी गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे उभारण्यात आलेल्या पोलीस कल्याण बहुउद्देशिय सभागृहाचे नुतनीकरण व सरस्वती विद्यालय प्रि-स्कुलचे उद्घाटन समारंभ आज दिनांक 24/11/2023 रोजी मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) म. रा. मुंबई श्री. प्रविण साळुंके सा. यांच्या हस्ते व गडचिरोली परिक्षेत्राचे मा. पोलीस उपमहानिरीक्षक श्री. संदिप पाटील सा. यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी पोलीस कल्याण बहुउद्देशिय सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी मा.अपर पोलीस महासंचालक सा. यांनी सांगितले की, गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार हे माओवाद विरोधी अभियान करीत असतात. त्यासाठी त्यांना आपली शारीरिक क्षमता सुदृढ ठेवणे अत्यंत आवश्यक असते. यासोबतच त्यांना विविध खेळ जोपासणे सुद्धा आवश्यक असल्याने या सभागृहात टेबल टेनीस, बॅडमिंटन, स्नूकर, बुद्धीबळ, कॅरम व इतर इनडोर खेळांकरीता आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याच्या माध्यमातून त्यांच्या शारीरिक क्षमतेत वाढ होण्यास फायदा होईल.
यासोबतच सरस्वती विद्यालयातील प्रि-स्कुलच्या उद्घाटन समारंभात मा. अपर पोलीस महासंचालक सा. यांनी चिमुकल्या विद्याथ्र्यांशी संवाद साधुन त्यांना मिठाई वाटप केली व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्या दिल्या.
यानंतर आयोजीत कार्यक्रमादरम्यान त्यांनी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या समस्या जाणून घेतल्या व आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी लाभ घेतला पाहीजे. तसेच दरवर्षी 26 जानेवारी व 15 ऑगस्ट रोजी गडचिरोली पोलीस दलातील जवानांना माओवादविरोधी अभियानादरम्यान दाखविलेल्या शौर्याकरिता शासनाकडुन विविध पदक प्राप्त होत असतात याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
सदर कार्यक्रमप्रसंगी गडचिरोली परिक्षेत्राचे मा. पोलीस उपमहानिरीक्षक श्री. संदिप पाटील सा., मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. लक्ष्मी केतकर मॅडम तसेच इतर पोलीस अधिकारी, अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.