विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांचा लाभ घ्यावा; - आ. डॉ. देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांचा लाभ घ्यावा; - आ. डॉ. देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन.!

दि. १८.११.२०२३ 
Vidarbha News India 
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांचा लाभ घ्यावा; - आ. डॉ. देवरावजी होळी यांचे जनतेला आवाहन.!
- सावेला, साखेरा, व जांभळी येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचे आमदार महोदयांच्या हस्ते उद्घाटन.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेकरिता १७ योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी निवड केली असून त्याकरिता विशिष्ट अधिकाऱ्यांकडे योजना राबविण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेने त्या माध्यमातून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सावेला व साखेरा आणि जांभळी येथील आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी केले. यावेळी मंचावर मा. तहसीलदार, बिडिओ यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी त्यांनी संबंधित योजना व त्यासंबंधी जबाबदार विभाग व  अधिकारी याबाबत माहिती दिली.
१)आयुष्यमान भारत- जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा श्यल्यचिकित्सक गडचिरोली, २)प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना -निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली ३) दीनदयाल अंतोदय योजना व ४) प्रधानमंत्री आवास योजना- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली,५)  प्रधानमंत्री उज्वला योजना-जिल्हा महिला बालविकास अधिकारी गडचिरोली, ६)प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना- महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली, ७) प्रधानमंत्री सन्मान किसान योजना व ८) किसान क्रेडिट कार्ड योजना- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली ,जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, सह आयुक्त मत्स्यसंवर्धन विभाग, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गडचिरोली, 
९) प्रधानमंत्री पोषण अभियान- उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण , १०) हर घर जल जल जीवन मिशन अभियान - प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जिल्हा परिषद, ११) स्वामित्व योजना - जिल्हा भुमी लेख अधिकारी गडचिरोली, १२)  जनधन योजना, १३) जीवन ज्योती बीमा योजना ,१४) अटल पेन्शन योजना आणि १५) सुरक्षा बीमा योजना - जिल्हा व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा अभियान व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद गडचिरोली व जिल्हा समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळ गडचिरोली, १६) प्रधानमंत्री प्रणाम योजना व १७)  नॅनो फर्टीलायझर - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली, जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, सह आयुक्त मत्स्यसंवर्धन विभाग, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गडचिरोली, या योजना व जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील जनतेने अवश्य घ्यावा असे आवाहन आमदार डॉक्टर  देवरावजी होळी यांनी केले आहे.
तसेच आदिवासी जिल्ह्याकरिता विशेष योजना राबविण्यात येत असून सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन अभियान, एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये नोंदणी, शिष्यवृत्ती योजना, वन हक्क कायदा वैयक्तिक आणि सामुदायिक जमीन, वन धनकेंद्र सहायता समूहामार्फत यादेखील योजना जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत त्याचाही लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->