दि. 30.11.2023
धार्मिक कार्यक्रमातून चांगले विचार आत्मसात करावे; आमदार डॉ. देवरावजी होळी
- श्री राधाकृष्ण रासलीला उत्सव समितीच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मौजा विष्णूपूर येथे श्री राधाकृष्ण रासलीला उत्सव समितीच्या वतीने धार्मिक व छत्तीसगड झाकीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवरावजी होळी हे होते, आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना बंगाली समाजाचे समस्या शासन दरबारी मांडून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम 9 वर्षाच्या कार्यकाळात पूर्णतःवास नेण्यासाठी प्रयत्नशील आहे असे मार्गदर्शन केले यावेळी उत्सव समितीच्या वतीने आमदार महोदयांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच असीम मुखर्जी, उपसरपंच महानंद हलदार, भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, भाजपा बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेशजी शहा, सुकेश शाकारी, नित्य ठाकूर, सुनील बिश्वास, झंडू बाला, दिलीप बिश्वास, दुलाल बिश्वास तथा भक्तगण उपस्थित होते.