LPG एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

LPG एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर.!

दि. 1 डिसेंबर 2023

Vidarbha News India 

LPG एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर.!

विदर्भ न्यूज इंडिया 

दिल्ली : LPG सिलिंडरच्या किमतीत या महिन्यातही पुन्हा वाढ झाली. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) शुक्रवार, 1 डिसेंबर रोजी व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमती प्रति सिलेंडर 21 रुपयांनी वाढवल्या.

वाढीनंतर, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1,796.5 रुपये झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 103 रुपयांनी वाढल्या होत्या. या वाढीनंतर हॉटेल, रेस्टॉरंट मालकांसह मिठाईवाल्यांना या गॅस दरवाढीचा मोठा फटका बसला आहे. चला, जाणून घेऊया देशातील महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत काय आहे?

या दरवाढीनंतर, मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,749 रुपये, चेन्नईमध्ये 1,968.5 रुपये आणि कोलकातामध्ये 1,908 रुपयांपर्यंत वाढेल. या ताज्या दरवाढीपूर्वी 16 नोव्हेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 57 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर

देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. 1 डिसेंबर 2023 रोजीही त्यांच्या किमती बदलल्या नाहीत. याचा अर्थ राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 903 रुपये आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->