दि. 1 डिसेंबर 2023
Vidarbha News India
ना दान पाहिजे! ना अनुदान पाहिजे! फक्त आम्हाला आमचा विदर्भ राज्य पाहिजे.!
- 3 डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या रॅलीत सहभागी व्हा - विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा आष्टीच्या वतीने करण्यात आले आवाहन.!
- विदर्भ राज्य आदोलन समिती जिल्हा शाखा - गडचिरोली स्वतंत्र विदर्भ राज्य विदर्भ मिशन 2023 अतंर्गत विदर्भ मिळवू औंदा 'विदर्भ निर्माण संकल्प यात्रा'.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/चामोर्शी : विदर्भवादी भावा - बहिनींनो, शेतकरी, कामगार व तरुण भावांनो, विदर्भ राज्याची मागणी 120 वर्षा पासून सुरु आहे. परंतु सर्वच पक्ष या विरोधात आहेत. विदर्भाचे स्वतंत्र राज्य झाले तर विदर्भ आणि आपल्या गडचिरोली जिल्ह्यास होणारे फायदे...
(1) महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) चे ऐवजी विदर्भ लोकसेवा आयोग (VPSC) निर्माण होईल. त्यामुळे या अंतर्गत निर्माण होणाऱ्या नौकऱ्या विदर्भातील युवकांनाच मिळतील नोकऱ्यांसाठी युवकांना विदर्भाच्या बाहेर जावे लागणार नाही. अधिकारी मुख्यालयी नसणे यावर उपाय होईल.
(2) वन कायद्यामुळे अडलेले तुलतुली, कारवाफा, चेंना या सारखे अनेक जलप्रकल्प मार्गी लागतील. स्थानिकांना विश्वासात घेऊन खनिजा वर आधारीत उद्योग निर्माण करता येतील.
(3) विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारे मारकंडा देवस्थान, सोममुर, टिपागड, जितम, खोब्राऐंठा, अरततोंडी या पर्यटन स्थळांचा विकास होऊन रोजगार निर्मीती होईल.
(4) विजेचे दर कमी होऊन स्वस्त दरात घरगुती व शेतकऱ्यांना वापरासाठी 24 तास मोफत पुर्ण दाबाची विज उपलब्ध राहील. (5) ज्या प्रमाणे छतीसगड आणि तेलंगाना या नजिकच्या राज्यात जिल्हे आणि तालुके वाढले त्याच प्रमाणे नागरीकांच्या सोयी नुसार विदर्भात सध्या असलेल्या 11 जिल्ह्याचे 25 पेक्षा जास्त जिल्हे होतील आणि 120 तालुक्यांचे 250 तालुके होतील. अहेरी जिल्हा निर्मीती त्याच प्रमाणे आष्टी, घोट, जिमलगट्टा, मालेवाडा, वडधा, रांगी, पोर्ला या आणि इतर तालुक्यांची निर्मिती होईल. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रशासकीय दृष्ट्या अंत्यत सोयीचे होईल. त्यांना लवकर न्याय मिळेल.
(6) प्रत्येक जिल्ह्यात शासकिय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये सुरु होतील.
(7) वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग सुरजागड - बल्लारशा मंचेरीअल कागजनगर पर्यंत वाढवून खनिजाची वाहतुक करता येईल तसेच प्रवासाची सोय करता येईल. हे जनते करिता व सर्वांसाठी सोयीचे होईल.
(8) गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर व दक्षिण भागाला लागून असलेल्या छत्तीसगड आणि तेलंगाना या छोट्या राज्यांचा विकास कश्या प्रकारे होत आहे हे सर्व आपण पहात आहोत पूर्वी छतीसगडचे मजुर आपल्या कडे काम करण्या करिता येत होते. आता आपले मजुर तेलंगानात रोजगारा साठी जात आहेत.
(9) विदर्भ राज्य आर्थिक दृष्ट्या संपन्न राज्य असणार आहे. त्या मुळे रस्त्याची कामे, सिंचन, आरोग्यसुविधा, ग्रामविकास, उद्योग, शिक्षण, रोजगार निर्मिती यांचा अनुशेष भरून निघेल...
"छोटे कुटुंब सुखी कुटुंब" त्याचप्रमाणे "लहान राज्य सुखी राज्य" तेलंगाना आणि छत्तीसगड राज्याचा विकास किती वेगाने झाला हे आपण पहातच आहोत. विदर्भाच्या जनतेच्या मनातील विदर्भ राज्य निर्मिती करिता गडचिरोली जिल्ह्यात उत्तर भाग आणि दक्षिण भागाचे टोका वरून दोन "विदर्भ निर्माण संकल्प यात्रा" काढून शहर, गाव, वस्ती, पाडे येथे जन जागरण करुन यात्रांचा समारोप 3 डिसेंबरला गडचिरोली मुख्यालयी होत आहे. या विदर्भ निर्माण संकल्प यात्रे मध्ये आपण सर्व जिल्हा वासीयांनी तन - मन - धनाने सहभागी होऊन सहकार्य करावे. त्याच प्रमाणे आपल्या मनातील भावना सुद्धा स्पष्ट पणे व्यक्त करावी. या चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहरात 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आगमन होत आहे करीता जास्तीत जास्ती संख्येने शहरातील व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा आष्टीच्या वतीने करण्यात आले आहे.