आदिवासी सन्मानार्थ गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजीत गडचिरोली महा-मॅरेथॉन-२०२४, सिझन २ च्या लोगोचे अनावरण - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

आदिवासी सन्मानार्थ गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजीत गडचिरोली महा-मॅरेथॉन-२०२४, सिझन २ च्या लोगोचे अनावरण

दि. १ डिसेंबर २०२३ 
Vidarbha News India 
आदिवासी सन्मानार्थ गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजीत गडचिरोली महा-मॅरेथॉन-२०२४, सिझन २ च्या लोगोचे अनावरण.!
​​​​– ०१ ते १० डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करता येणार.! 
विदर्भ न्यूज इंडिया 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी तरुण युवक-युवतींना स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी निर्माण व्हावी, तसेच आदिवासी भागात विकास व्हावा यासाठी सामाजिक बांधीलकीच्या दृष्टीने, आदिवासी समाजाच्या विकास व सन्मानास्तव नूतन वर्षात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण शुक्रवार ०१ डिसेंबर २०२३ रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयात गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.

या मॅरेथॉन स्पर्धेत, ०३ किमी, ०५ किमी, १० किमी व २१ किमी अंतराची स्पर्धा आयोजीत करण्यात आली असून, यामध्ये समाजाच्या सर्वच स्तरातून आबालवृद्धांचा सुमारे १३ ते १५ हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. गडचिरोली महा मॅरेथॉन २०२३ मध्ये दहा हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असून विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. सहभागी असलेल्या सर्व धावपटूंना किट, टी-शर्ट, बॅजेस, मेडल्स, प्रमाणपत्रे इ. देण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात स्पर्धेची तयारी सुरु असून अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश व उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली मयुर भुजबळ हे स्पर्धेंची संपूर्ण व्यवस्था पाहत आहेत. स्पर्धेत सहभाग होऊ इच्छिणा­यांनी जवळच्या पोलीस स्टेशन/उप पोलीस स्टेशन/पोलीस मदत केंद्र येथे संपर्क साधावा. तसेच या मॅरेथॉन स्पर्धेची नोंदणी मोफत असणार आहे, त्यामुळे अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. 

Share News

copylock

Post Top Ad

-->