९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.!

दि. १ डिसेंबर २०२३ 
Vidarbha News India 
९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : अनेकदा न्यायालयाच्या चकरा मारूनही न्याय मिळण्यास विलंबच होतो, असा
अनुभव काहींना आला असेल. कंटाळून 'शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये' असेही वाटले असेल, परंतु न्याय प्रक्रियेत जलद न्याय मिळविण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. हे मात्र अनेकांना माहित नसेल. हा पर्याय म्हणजे राष्ट्रीय लोक अदालत होय, याच राष्ट्रीय लोक अदालतच्या माध्यमातून देशात अनेक वाद निकाली निघाले आहे. राष्ट्रीय लोक अदालत ही एक पर्यायी विवाद निवारण यंत्रणा आहे. न्यायालयात प्रलंबित असलेले वाद तडजोडीने मिटवण्याचा तो एक मंच आहे. या ठिकाणी सामंजस्याने वादाची प्रकरणे सोडविली जातात. जी दोन्ही बाजूंसाठी फायदेशीर ठरतात. लोक अदालतीच्या माध्यमातून न्याय तात्काळ मिळतो, पैसा आणि वेळेची बचत होते. लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो. निकाली निघणा-या प्रकरणांमध्ये कोर्ट फी ची रक्कम परत मिळते. परस्पर संमतीने निकाल होत असल्यामुळे एकमेकातील व्देष वाढत नाही आणि कटूताही निर्माण होत नाही. लोक अदालत संपुर्ण भारत भरातील न्यायालयांमध्ये भरवली जाते. दिनांक ९ डिसेंबर, २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालत जिल्हा व सत्र न्यायालय,गडचिरोली आणि अहेरी तसेच तालुका न्यायालय आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. सर्व तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांची सर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्याबाबत आदेश दिलेले आहे. तरी सर्वांनी दिनांक ०९ डिसेंबर, २०२३ रोजी होणा-या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये नगरपरिषद/नगरपंचायत व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून लोक अदालतीचा लाभ घ्यावा आणि लोक अदालत यशस्वी करावी असे आवाहन  श्रीमती आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी समस्त जनतेला केलेले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->