दि. १८.११.२०२३
पलखेडा या अतिदुर्गम गावाला भेट देणारे पहिले आमदार डॉ. देवरावजी होळी
- मोठे वाहन जात नसल्याने मोटर सायकलने पोहोचले पलखेडा या गावात...
- रस्त्यांची, मूलभूत सोयी सुविधांची पाहणी करून जाणून घेतल्या समस्या...
- डी- लिस्टिंग संदर्भात केली आदिवासी बांधवांशी चर्चा व २१ नोव्हेंबरच्या मोर्चाला येण्याचे केले आवाहन
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : पलखेडा हे धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम, नक्षल प्रभावित आदिवासी गाव. या गावात स्वातंत्र्यानंतर कोणताही आमदार, खासदार पोहोचलेला नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली व आपण या गावात पोहोचणारे पहिले आमदार असल्याचे आनंदाने सांगत गावकऱ्यांनी आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गावातील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या रस्त्यांची, मूलभूत सोयी सुविधांची पाहणी केली व या गावाच्या विकासासाठी आपण आवश्यक तो निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले.
यासोबतच २१ नोव्हेंबरला आदिवासी समाजाचा डी लिस्टिंग संदर्भामध्ये नागपूर येथे विराट मोर्चा आयोजित करण्यात आलेला असून या मोर्चाला आपण सर्वांनी अवश्य यावे असे आवाहन केले.