दि. ९ नोव्हेंबर २०२३
Vidarbha News India
Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात! राज्यभर करणार दौरे, असा असेल पुढचा प्लॅन.!
विदर्भ न्यूज इंडिया
राज्यभरात मनोज जरांगे पुन्हा एकदा दौरे करणार आहेत. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना यासंबधीची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या गाठी भेटी घेण्यासाठी ते पुन्हा दौरा सुरू करीत आहे.
१५ नोव्हेंबर पासून ते २३ नोव्हेंबर दौरे करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.
यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्याचे स्वरूप देखील सांगितले आहे. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी त्यांच्या दौऱ्याबाबतची माहिती दिली आहे.
१५ नोव्हेंबर रोजी वाशी, परांडा, करमाळा
१६ नोव्हेंबर रोजी दौंड, मायणी
१७ नोव्हेंबर रोजी सांगली, कोल्हापूर, इस्लामपूर, कराड
१८ नोव्हेंबर रोजी सातारा, मेंढा, वाई, रायगड
१९ नोव्हेंबर रोजी रायगड, राडगड दर्शन, रायगड ते पाचाड दर्शन, मुळशी आंळदी
२० नोव्हेंबर रोजी तुळापुर, पुणे, खराडी, चंदननगर, आंळदी, खालापुर, कल्याण
२१ नोव्हेंबर रोजी ठाणे, पालघर, नाशिक त्र्यबंकेश्वर,
२२ नोव्हेंबर रोजी विश्रांतगड, संमगमनेर, श्रीरामपुर
२३ नोव्हेंबर रोजी नेवासा, शेवगाव, बोधेगाव, धोंडराई त्यानंतर आंतरवली.
हा त्यांच्या दौऱ्याचा तिसरा टप्पा असणार आहे, तर पुढच्या चौथ्या टप्प्यामध्ये आपण राहिलेला मराठवाडा, विदर्भ, कोकण असे ६ टप्प्यात आपण दौरे करणार असल्याची माहिती यावेळी जरांगे यांनी दिली आहे.
कोल्हापूर येथून शाहू महाराजांच्या स्मारकापासून या दौऱ्यांची सुरुवात करणार असल्याचेही मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे.
मनोज जरांगे हे १५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या दरम्यान राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहेत. एकूण ६ टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे हे कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे.