दि. ९ नोव्हेंबर २०२३
नागपूर : सिंगोरी येथे विद्यार्थी दिवस साजरा...
प्रतिनिधी : रजत डेकाटे
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर/मौदा: सिंगोरी नरसाळाकेंद्र-तारसा पंस.मौदा जि.प.नागपूर येथे मान.दिलीप वैद्य (अध्यक्ष. शा.व्य.स.)यांच्या हस्ते महामानव विश्वरत्न भारतरत्न घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन विनम्रतापुर्वक अभिवादन करण्यात आले. तसेच राजु नवनागे( मु.अ)व उपस्थितीतांनी सुमने अर्पण केलीत.राजु नवनागे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल या शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांना वर्गात बसण्यास मज्जाव केल्या जायचा ते शाळेच्या बाहेर बसुन शिक्षण घ्यायचे,कठीण प्रसंग असुनही त्यावेळेस त्यांची परिस्थिती हलाखीची होती.त्यांनी खुप संघर्ष केला. त्यातुनच बाहेर देशात जाउन शिक्षणात अतिउच्च हिमालयाएवढी प्रगती गाठली.म्हणूनच त्यांना "सिम्बॉल आँफ नाँलेज "जगातील हुशार विद्यार्थी म्हणतात.प्रचंड ज्ञानवंत, प्रतिभावान, तत्वज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,न्यायशास्त्रज्ञ,राजकारणी,समाजसुधारक, मानववंशशास्त्रज्ञ,शिक्षणतज्ज्ञ, घटनातज्ञ,पर्यावरणतज्ञ,बहुभाषिक,भाषाशास्त्रज्ञ, वक्ते, इतिहासकार अशा अनेक उपाधींनी अनेक देशात नावलौकिक मिळवणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर होत.ते म्हणतात " शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे,ते प्राशन केलेला गुरगुरल्या शिवाय राहणार नाही." वाचाल तर वाचाल ".विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेला राष्ट्रीय ग्रंथ " भारतीय राज्यघटना "तसेच इतर ग्रंथ वाचावेत.वाचल्याने ज्ञान वाढते.आदर्श विद्यार्थी, नागरिक घडावेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अमंलात आणावेत.अशाप्रकारे विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक,माजीविद्याथी,सुनील नगरारे,तुळसाबाई नगरारे,सविताताई पडोळे, कु.साधना वैद्य, स्वप्निल वैद्य, सचिन सरोते,अजय सरोते,आदित्य मोजनकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. अशाप्रकारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिन साजरा करण्यात आला.