मुंबई हल्ल्याच्या 15 व्या वर्षपूर्तीपूर्वी इस्रायलचं वक्तव्य चर्चेत, पाकवर आरोप.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

मुंबई हल्ल्याच्या 15 व्या वर्षपूर्तीपूर्वी इस्रायलचं वक्तव्य चर्चेत, पाकवर आरोप.!

दि. 23.11.2023 

Vidarbha News India 

मुंबई हल्ल्याच्या 15 व्या वर्षपूर्तीपूर्वी इस्रायलचं वक्तव्य चर्चेत, पाकवर आरोप.!

विदर्भ न्यूज इंडिया 

मुंबई : 26 नोव्हेंबर 2008 रोजी भारतामध्ये मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. सागरी मार्गाने पाकिस्तानमधून मुंबईत आलेल्या 10 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.

त्यात एकूण 166 लोक मारले गेले होते. मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षं पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, इस्रायल सरकारने आपली प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानातून कार्यरत असलेली लष्कर-ए-तोयबा (एलईटी) ही संघटना आपल्या लेखी दहशतवादी संघटनाच असल्याचा पुनरुच्चार इस्रायल सरकारने मंगळवारी केला आहे.

या संदर्भात इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिओर हयात म्हणाले की, काही दिवसांपूर्वी 'मुंबई हल्ल्याच्या 15व्या स्मृतीदिनाच्या अनुषंगाने एलईटीला दहशतवादी संघटना घोषित करण्यात आलं आहे' असा संदेश पाठवला गेला होता. पण, ही घोषणा नवीन नाही. नोकरशाही स्तरावरील त्रुटीमुळे हा प्रकार घडला आहे. त्यांच्या सरकारने 2013 मध्येच एलईटीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं.

हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर भारतानेही हमासला दहशतवादी संघटना घोषित करावं अशी विनंती इस्रायलने भारताला केली होती. इस्रायलच्या दूतावासाने आपल्या नवीन संदेशात म्हटलं आहे की, एलईटीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची विनंती भारताने इस्रायलला केली नव्हती. पण, इस्रायलने आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आणि एलईटीचा दहशतवादी यादीत समावेश केला.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे वरिष्ठ सल्लागार आणि दूत मार्क रेगेव्ह यांनी मंगळवारी सांगितलं की, दुसऱ्या महायुद्धानंतर ज्याप्रमाणे संपूर्ण जर्मनी हा देश नाझी मुक्त करण्यात आला होता त्याचप्रमाणे इस्रायलसुद्धा गाझापट्टीला हमासपासून मुक्त करेल. गाझाचा ताबा घेणं, हा इस्रायलचा उद्देश नाही. पण, या भागाचं नि:शस्त्रीकरण गरजेचं आहे.

रेगेव्ह म्हणाले की, भारतात पार पडलेल्या जी-20 शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी भारत-अरब-युरोप कॉरिडॉरचा प्रस्ताव मांडला. हमास-इराण-हिजबुल्लाही याला स्वतःसाठी धोका मानतात. अरब देशांमध्ये कतारशिवाय हमासचा इतर कोणीही मित्र नाही.

26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 60 तासांपेक्षा जास्त काळ दहशत माजवली होती. यादरम्यान त्यांनी शहरातील महत्त्वाची ठिकाणं, एक हॉस्पिटल आणि ज्यूधर्मीयांच्या सेंटरला लक्ष्य केलं होतं.


Share News

copylock

Post Top Ad

-->