अन् आत्मविश्वास वाढला.. मोदी बनले तेजस फायटर प्लेनचे पायलट; सांगितला थरारक अनुभव.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

अन् आत्मविश्वास वाढला.. मोदी बनले तेजस फायटर प्लेनचे पायलट; सांगितला थरारक अनुभव.!

दि. 25.11.2023 

Vidarbha News India 

PM Modi Tejas : अन् आत्मविश्वास वाढला.. मोदी बनले तेजस फायटर प्लेनचे पायलट; सांगितला थरारक अनुभव.!

PM Modi in Tejas Jet : VNI : 

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज तेजस फायटर प्लेन चालवण्याचा अनुभव घेतला. आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन फोटो शेअर करत पंतप्रधानांनी याबाबत माहिती दिली. या अनुभवामुळे आपला देशाच्या क्षमतेवरील विश्वास वाढला आहे.

आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आहोत, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी आज बंगळुरूमधील हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या फॅसिलिटीला (HAL) भेट दिली. यावेळी त्यांनी तेजस जेट विमानाच्या निर्मिती कारखान्याची पाहणी केली. सोबतच त्यांनी तेजस विमानामध्ये भरारी देखील घेतली.

तेजस हे सिंगल सीटर जेट विमान आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी ट्विन-सीटर तेजस विमानाची सफर केली. यामध्ये पंतप्रधान मोदी मागे बसले होते. या ट्विन सीटर व्हेरियंटचा उपयोग ट्रेनिंगसाठी केला जातो.

कसं आहे तेजस?

तेजस हे भारतीय बनावटीचं एक लाईट-कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. हे कोणत्याही हवामानामध्ये यशस्वी उड्डाण भरू शकतं. याला LiFT म्हणजेच लीड-इन फायटर ट्रेनर असंही म्हटलं जातं. भारतीय वायुसेनेने HAL ला 123 तेजस विमानांची ऑर्डर दिली आहे. यातील 26 तेजस मार्क-1 आतापर्यंत डिलिव्हर करण्यात आले आहेत. HAL आता याचं अपग्रेडेड व्हर्जन देखील बनवत आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->