दि. २२.११.२०२३
प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते देवकाबाई देठे यांच्या पुतळ्याचे अनावरण.!
प्रतिनिधी/रजत डेकाटे
विदर्भ न्यूज इंडिया
नागपूर : नागपूर येथील हजारीपाहाड येथे पुर्व विदर्भ रमाई ब्रिगेड महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षाताई देठे यांच्या घरी त्यांच्या मातोश्री देवकाबाई देठे यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
देवकाबाई देठे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी देवकाबाई देठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे दलित मुक्ती सेनेचे अध्यक्ष अजय चव्हाण पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते संजय खांडेकर, अरुण साखरकर, गौतम गेडाम, नागपूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा सुधा मस्के उपस्थिती लाभली होती.
यावेळी मनोहर बोरकर, संजय कांबळे, विनायक देठे,उमेश देठे,सुखदेव मेश्राम, राजकुमार देठे,लोकेश गौरखेडे, दिलीप वासनिक, सुरेश मेश्राम, प्रविण देठे,नंदलाल देठे,अरविंद वालदे, विकास देठे, विजय देठे,रवी मेश्राम, आदर्श सरोदे, अरुणा देठे, संघमित्रा देठे,धुरपता मेश्राम, वंदना कांबळे,छाया देठे, माया बोरकर, विशाखा देठे,शिला मघाडे, छाया मेश्राम,गिता वालदे, स्नेहल मेश्राम, पौर्णिमा ज्योस्ना ठाकरे, पंचशिला,सिमा चंद्रीकापुरे, मीना गायकवाड यांची यावेळी उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रणित देठे,बुध्दभुषण देठे, सारंग देठे,पलक देठे,रिदिमा देठे व नव्या देठे संपूर्ण सहकार्य केले.