दि. २२.११.२०२३
गडचिरोली जिल्ह्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्या ; - आ. डॉ. देवरावजी होळी
- आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतली वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार यांची भेट.!
- येणाऱ्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यात गडचिरोली जिल्ह्यासाठी मोठा निधी मंजूर करण्याची केली विनंती.
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा दुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये विकासाची कामे सुरू आहेतच परंतु जिल्ह्याच्या विकासासाठी अजूनही मोठ्या निधीची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील रस्ते पूल प्रशासकीय इमारतींसाठी निधीची गरज आहे. त्याकरिता आपण गडचिरोली जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा त्यासाठी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये जिल्ह्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी अशी विनंती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मुंबई मंत्रालयामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार यांची भेट घेऊन केली.