दि. ८ नोव्हेंबर २०२३
आदिवासी आघाडीच्या प्रदेशाच्या बैठकीला आमदार डॉ. देवरावजी होळी यांची उपस्थिती.
- प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न.!
विदर्भ न्यूज इंडिया
मुंबई : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने मुंबई येथे आदिवासी आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबईच्या सभागृहात संपन्न झाली या बैठकीला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी पूर्णवेळ उपस्थित होते.
या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. बैठकीला प्रदेशातील आदिवासी आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.