दि. ८ नोव्हेंबर २०२३
भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे यांनी अश्वमेध पवित्र मंगल शक्तीकलश यांना केले नमन.
- गडचिरोली शहरामध्ये अश्वमेध महायज्ञ पवित्र मंगल शक्तीकलशचे आगमन.
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : दिनांक २३ ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान नवी मुंबई येथे अश्वमेध महायज्ञ होत असून अश्वमेध महायज्ञाचा पवित्र मंगल शक्तीकलश संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करीत आहे.
आज गडचिरोली शहरामध्ये या पवित्र मंगल शक्तीकलशाचे आगमन झाले असता स्थानिक इंदिरा गांधी चौकामध्ये भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगिताताई पिपरे यांनी शक्तीकलशाची पूजा-अर्चना करून कलशला नमन केले.
यावेळी पुष्पाताई सातपुते,माजी नगरसेविका लताताई लाटकर,रंजना कोठारे,जुवारेताई, रुपाली कावळे, सुनीता साळवे,आकेवार ताई व माँ गायत्री साधना भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.