गडचिरोलीत निघणार विदर्भ निर्माण संकल्प प्रचार यात्रा - ॲड. वामनराव चटप - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

गडचिरोलीत निघणार विदर्भ निर्माण संकल्प प्रचार यात्रा - ॲड. वामनराव चटप

दि. २०.११.२०२३ 

Vidarbha News India 

गडचिरोलीत निघणार विदर्भ निर्माण संकल्प प्रचार यात्रा - ॲड. वामनराव चटप

विदर्भ न्यूज इंडिया 

प्रतिनिधी/चंद्रपूर : विदर्भ मिळवू असा संकल्प करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने आंदोलन अधिक आक्रमक करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत विदर्भ आंदोलनाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विदर्भ निर्माण संकल्प यात्रा काढण्यात येणार असून, गडचिरोली जिल्ह्यात एकाच दिवशी दोन ठिकाणाहून ही यात्रा निघणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक ॲड.

वामनराव चटप यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार परिषदेत दिली.

पहिली प्रचार यात्रा १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता अहेरीवरून निघणार आहे. अहेरी, ताडगाव, भामरागड येथे येऊन मुक्काम करेल, २ डिसेंबर रोजी भामरागड, एटापल्ली, मुलचेरा आणि घोट अशी पोहोचेल. ३ डिसेंबर रोजी घोटवरून चामोर्शी मार्गे गडचिरोली येथे पोहोचेल. तर दुसरी संकल्प प्रचार यात्रा १ डिसेंबरलाच कोरची येथून निघणार असून, पहिला मुक्काम पुराडा येथे होणार आहे. २ डिसेंबर रोजी पुराडा,कुरखेडा, वडसा, आरमोरी येथे येऊन आरमोरीत मुक्काम होईल. ३ डिसेंबर रोजी आरमोरी, धानोरा व्हाया गडचिरोली येथे पोहोचेल. दुपारी ३ वाजता दोन्ही संकल्प यात्रा गडचिरोली पोहोचल्यानंतर येथे जाहीर सभा होणार आहे. या संकल्प प्रचार यात्रेचे नेतृत्व अरुण केदार, मुकेश मासुरकर, डॉ. रमेशकुमार गजभिये, राजेंद्रसिंह ठाकूर, घिसू पाटील खुणे, अरुण मुनघाटे, जुम्मन शेख, राजकुमार शेंडे, शालिक नाकाडे करणार आहेत. 

Share News

copylock

Post Top Ad

-->