दि. 20.11.2023
Vidarbha News India
World Cup 2023: फायनल सामना ठरला रेकॉर्ड ब्रेक; 'इतक्या' कोटी प्रेक्षकांनी घेतला आनंद
World Cup 2023 IND vs AUS Final:
विदर्भ न्यूज इंडिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी खेळला गेलेला ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 'डिस्ने + हॉटस्टार' वर एकाच वेळी 5.9 कोटी प्रेक्षकांनी पाहिला.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलिया विश्वविजेता बनला आणि वनडे क्रिकेटच्या इतिहासात सहाव्यांदा विश्वचषक पटकावला.
टीम इंडियाच्या विजयाची अपेक्षा करणाऱ्या करोडो भारतीयांची निराशा झाली. गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर निराशेचे वातावरण होते.
सामन्यादरम्यान पहिल्या आठ षटकांमध्ये प्रेक्षकांची संख्या 5.5 कोटींवर पोहोचली होती. ऑस्ट्रेलिया जेव्हा फलंदाजीला उतरला तेव्हा प्रेक्षकांची संख्या पुन्हा वाढू लागली. विशेषत: पॉवरप्लेदरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाच्या दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
डिस्ने-हॉटस्टारच्या मते, या विक्रमासह भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात 5.3 कोटी प्रेक्षकांचा विक्रमही मोडला आहे. यापूर्वी, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना आजपर्यंतच्या सर्वाधिक 4.4 कोटी प्रेक्षकांनी पाहिला होता.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेलेला सामना 4.3 कोटी प्रेक्षकांनी पाहिला होता, तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 3.5 कोटी लोकांनी पाहिला होता.
डिस्ने-हॉटस्टार इंडियाचे प्रमुख सजिथ शिवनंदन म्हणाले, 'डिस्ने-हॉटस्टारवर 5.9 कोटी प्रेक्षकांनी अंतिम सामना पाहिला, ज्याने सर्व रेकॉर्ड तोडले. भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या पाठिंब्याने आम्हाला लाइव्ह स्पोर्ट्स स्ट्रीमिंगमध्ये नवीन उंची गाठण्यासाठी सतत प्रेरणा दिली आहे.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 240 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने 43 षटकांत लक्ष गाठले. टीम इंडियाकडून विराट कोहलीने 54 धावा केल्या. केएल राहुलने 66 धावांची खेळी केली. रोहित शर्माने 47 धावा केल्या.
या दोघांशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला विशेष काही करता आले नाही. भरताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने 2 विकेट घेतल्या. मोहम्मद शमीला एक विकेट मिळाली. या विश्वचषकात भारताने यापूर्वी 10 सामने खेळले होते आणि ते सर्व जिंकले होते.