राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! पुढील दोन दिवस अलर्ट.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! पुढील दोन दिवस अलर्ट.!


दि. 27.11.2023

Vidarbha News India 

Maharashtra Weather Update : राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! पुढील दोन दिवस अलर्ट.!

Maharashtra Weather Update : 

विदर्भ न्यूज इंडिया 

मुंबई : पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी अंरिंज व यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पाऊस व गारा पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वा-यांशी संयोग झाला आहे.

त्यामुळे कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून येत असल्यामुळे अनुकूल वातावरण तयार होऊन पाऊस पडला आहे. नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसासह गारपीट झाली.

२७ व २८ नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात यलो अलर्ट असून येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पालघरमध्ये दमदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर काही भागात गारा पडणार आहेत. विदर्भात ऑरेंज अलर्ट असून अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये मुसळधार पाऊस व गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ढगाळ हवामान व पाऊस यामुळे तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये अवकाळीचे ८ बळी

गुजरातमध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडून ८ जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले, गडगडाटासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाले. या आपत्तीमुळे पशुधनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती रविवारी अधिकाऱ्याने दिली.

राज्यातील २५१ तालुक्यांपैकी २२० तालुक्यामध्ये शनिवारी सायंकाळी ६ वाजेपासून पुढील १० तासांमध्ये ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. यादरम्यान रविवारी सकाळी अहमदाबाद शहरात १५ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळीदेखील या शहरात पावसाच्या सरी बरसल्याने लोकांना घराबाहेर पडता आले नाही.


Unseasonal Rain : राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा; पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान

अवकाळीच्या संकटामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे. पुन्हा एकदा अवकाळीनं अनेक भागांत अवकृपा केली आहे. रात्री झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली.

पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान, पुण्यातल्या आंबेगावात गारपिटीचा (Hail Storm) जोरदार तडाखा बसला आहे. कांदा आणि बटाटा पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. तर निफाडमध्येही गारपिटीनं झोडपलं, द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. हवामान विभागानं (Indian Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्री जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस बसला आहे ढगाच्या सह बरसलेल्या पावसामुळे शेतातील कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हिंगोली जिल्ह्यांमध्ये कापूस उत्पादक शेतकरी या रात्रीच्या पावसामुळे चांगले संकटात सापडले आहेत कारण व्यसनीला आलेला कापूस या पावसामुळे पूर्णपणे भिजला आहे सुरुवातीपासूनच पाऊस काळ कमी कमी होता पावसाने मारलेली दडी या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कापसाचे पीक जोपासली होती परंतु रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे,

पुण्यात आंबेगाव तालुक्यातील बहुतांश गावात गारपिटीचा तडाखा

पुण्यातील उत्तर भागात काल अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. आंबेगाव तालुक्यातील बहुतांश गावात गारपिटीचा तडाखा बसलाय. कालची गारपीटीची दृश्य आता समोर आलेली आहे. लोणी, धामणी, खडकवाडी गावातील शेतकऱ्यांच्या कांदा रोपांचे नुकसान झालंय. तर काही भागात बटाटा पिकाला काही प्रमाणात फटका बसलाय.

हिंगोलीत कापसाला मोठा फटका

हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्री जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस बसला आहे. शेतातील कापसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये कापूस उत्पादक शेतकरी या रात्रीच्या पावसामुळे चांगले संकटात सापडले आहेत. कारण वेचणीला आलेला कापूस या पावसामुळे पूर्णपणे भिजला आहे.

वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने पारनेरला झोडपले

अहमदनगर जिल्ह्याला काल अवकाळी पावसाने झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाचा पारनेर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. पारनेर तालुक्यात कांदा, टोमॅटो, मका, ज्वारी तसेच फळबागांना फटका बसला आहे. पारनेरच्या पानोली, जवळा, निघोज या गावांमध्ये गारांचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्यानी सकाळी पाहणी केली.दरम्यान शासनाने तातडीने या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत अशी मागणी केली.

कांद्याचे मोठे नुकसान

उन्हाळा कांदा संपून आता लाल कांदा बाजारात यायला सुरुवात झालेली असतांना आज अवकाळी पाऊस व गारपिटीने पुन्हा एकदा चांगलेच झोडपल्याने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन महिन्यापासून दुष्काळाची परिस्थिती असतांना कांद्याची लागवड करून वाढवण्यात आला होती. शेतातून कांदे काढायचे अन् बाजारात विकायचे अशी परिस्थिती असतांना अवकाळी पाऊस व गारपिटीने आज शेतकऱ्याचा कांद्यावर घाला घातला.या गारपिटीमुळे शेतातील कांदा सडून शेतकऱ्याच्या हाती काहीच शिल्लक राहणार नाही.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान, गारपिटीमुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होऊन भविष्यात पुन्हा ' कांदा ' टंचाई निर्माण होणार आहे.

20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात

आवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्याकडून खरेदी केलेली जवळपास 20 ते 25 हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजल्याने खराब होण्याची शक्यता आहे. पावसात भिजल्याने 30 टक्के मिरची खराब होण्याचा अंदाज आहे. दोन ते तीन कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


Share News

copylock

Post Top Ad

-->