दि. 27.11.2023
गोकुलनगर आंबेडकर चौक येथे संविधान दिवस साजरा
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : स्थानिक गोकुलनगर येथील आंबेडकर चौक येथे लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे व भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान दिवस साजरा करण्यात आला. घटनेचे शिल्पकार, संविधान समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी प्रमोदजी पिपरे व सौ.योगीताताई पिपरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी महिला आघाडी शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे,पुष्पा करकाड़े,विजय शेडमाके,दलित आघाडी शहर अध्यक्ष प्रा.अरुण उराडे,माजी नगरसेविका निताताई उंदिरवाडे,कोमल बारसागडे,ज्योती बागडे,राऊतताई गोकुलनगर येथील नागरिक उपस्थित होते.