तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांना अटक; व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांना अटक; व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल.!

दि. २७.११.२०२३ 

Vidarbha News India 

Gadchiroli News : तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांना अटक; व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल.!

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली/आरमोरी : वाढदिवसाच्या दिवशी रस्त्यावर हुल्लडबाजी करीत तलवारीने केक कापणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणांनी तलवारीने केक कापत, हुल्लडबाजी केली. त्यांच्या या प्रकाराचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होताच पोलिसांनी पाच युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

केक कापण्यासाठी वापण्यात आलेली तलवार आणि आरोपींच्या गाड्यादेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. लोकेश विनोद बोटकावार (वय २२), लोकमित्र खुशाल ठाकरे (वय २५), बादल राजेंद्र भोयर (वय २३), पवन मनोहर ठाकरे(वय २५), राहुल मनोहर नागापुरे (वय २८) सर्व रा. बाजारटोली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली, अशी आरोपींची नावे आहेत.

आरमोरी शहरालगत रामाळा मार्गावर २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते १२.३० वाजतादरम्यान या आरोपी तरुणांनी मित्राच्या वाढदिवशी हुल्लडबाजी करत तलवारीने केक कापले. दरम्यान, त्यांनी या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.हा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. यात आरोपी तरुण हातात तलवार घेऊन केक कापत असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या निर्देशानुसार आरमोरी पोलिसांनी तत्काळ पावले उचलत संबंधित तरुणांवर हत्यार प्रतिबंधित कायद्यानुसार कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. यातील राहुल नागापुरे फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

या कारवाईत एक धारदार, टोकदार तलवार अंदाचे किंमत १५०० रुपये, एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची अँक्टीवा ६ जी गाडी क्रमांक एम. एच. ३३ ए.ए. १३४० अंदाजे किंमत ५५००० , एक जुनी वापरती काळ्या रंगाची सुपर स्प्लेडंर प्लस वाहन क्रमांक एम.एच ३३ वाय ७८५४ अंदाजे किंमत ४० हजार असा एकूण ९६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Share News

copylock

Post Top Ad

-->