दि.२६.११.२०२३
जि.प उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे संविधान दिन मोठ्य उत्साहात साजरा.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली/ चामोर्शी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे आज दिनांक 26/11/2023 रोज रविवार ला ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री धनराज भाऊ बुरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा माल येथील पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक श्री अशोक जुवारे सर,श्री जगदीश कळाम सर,श्री राजकुमार कुळसंगे सर, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री चरणदास बुरे,श्री रुषीदेव मेश्राम तसेच शाळेतील विद्यार्थी यांचे प्रमुख उपस्थितीत संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्येशिकेचं वाचन करण्यात आले.संविधान दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनराज भाऊ बुरे,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर सर,सहायक शिक्षक श्री अशोक जुवारे सर,श्री राजकुमार कुळसंगे सर यांनी आपल्या भाषणातुन मार्गदर्शन केले.आणि संविधान दिन मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.
आजच्या संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनराज भाऊ बुरे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पदवीधर शिक्षक श्री रघुनाथ भांडेकर सर होते.विशेष अतिथी म्हणून श्री चरणदास बुरे,श्री रुषीदेव मेश्राम,श्री अशोक जुवारे सर,श्री जगदीश कळाम सर,श्री राजकुमार कुळसंगे सर आदी मान्यवर लाभले होते.
सर्वप्रथम उपस्थित प्रमुख मान्यवरांचे हस्ते संविधानाची प्रत व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले.तदनंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धनराज भाऊ बुरे व प्रमुख अतिथी श्री रघुनाथ भांडेकर सर यांनी आपल्या भाषणातुन संविधानाची ओळख उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना करून दिली.आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री जगदीश कळाम सर सर यांनी केले.आणि कार्यकमाचे शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले.