बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका! 'या' ठिकाणी संपर्क करा, रक्कम लगेच होईल होल्ड.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका! 'या' ठिकाणी संपर्क करा, रक्कम लगेच होईल होल्ड.!

दि. २ नोव्हेंबर २०२३ 

Vidarbha News India 

बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका! 'या' ठिकाणी संपर्क करा, रक्कम लगेच होईल होल्ड.!

विदर्भ न्यूज इंडिया 

मुंबई : सायबर गुन्हेगारांकडून अनेकांना आर्थिक गंडा घातला जातोय. काहीतरी अमिष दाखवून देखील बॅंक खात्यातील पैसे लंपास केले जातात. दुसरीकडे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना एक-दोन चुकतात आणित दुसऱ्याच व्यक्तीला पैसे जातात.

अशोवळी संबंधिताने १५५२६० या क्रमांकावर लगेचच कॉल करावा. त्यावेळी चुकीच्या व्यक्तीला गेलेली रक्कम थांबविता येतात.

काही मिनिटांत रक्कम होल्डवर जाईल

सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल करावा. त्यानंतर सायबर यंत्रणा लगेचच कामाला लागते आणि अवघ्या ७ ते ८ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते. कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.

यंत्रणा काम कशी करते?

हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाईल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ, अशी महत्त्वाची माहिती विचारली जाते. त्यानंतर सर्व माहिती  http://cybercrime.gov.in/ या गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरील डॅशबोर्डवर शेअर केली जाते. याकामी 'आररबीय'चेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.

हेल्पलाईन फसलेल्यांसाठी सुरक्षा कवच

एक प्रकारचे सुरक्षा कवच http://cybercrime.gov.in/ हे संकेतस्थळ आणि १५५२६० हा हेल्पलाइन क्रमांक म्हणजे एकप्रकारे सुरक्षा कवच आहे. याला 'इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन प्लॅटफार्म' असेही म्हणतात. याच्याशी जवळपास ५५ बॅंका, ई-वॉलेटस्, पेमेंट गेटवेज, ई-कॉमर्स संकेतस्थळ आणि अन्य वित्तीय सेवा देणाऱ्या खूप संस्था जुळलेल्या आहेत.

Share News

copylock

Post Top Ad

-->