माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सातत्याने केलेल्या वनविभागाच्या पाठपुराव्याला मिळाले यश.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



"विदर्भ न्यूज इंडिया" कडून वाचक,जाहिरातदार,हितचिंतक व समस्त जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...

माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सातत्याने केलेल्या वनविभागाच्या पाठपुराव्याला मिळाले यश.!

दि. 02.12.2023
Vidarbha News India 
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सातत्याने केलेल्या वनविभागाच्या पाठपुराव्याला मिळाले यश.!
- वनविभागाच्या अतिक्रमित जमिनीची मोजणी करिता शासनाने दिली मंजुरी.!
- मूलचेरा तालुक्यातील 5 गावातील 29 अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : मूलचेरा तालुक्यातील 69 गाव पैकी  22 गावे ही बंगाली बहुल आहेत.या भागातील 5 गावातील बंगाली बांधव मागील अनेक वर्षापासून वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आपला उदरनिर्वाह करीत आले आहेत.या अतिक्रमित वनजमिनीचे मोजमाप करून सातबारा मिळावा यासाठी वनविभागाकडे त्यांनी मागणी लावून धरली होती.विशेष म्हणजे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी यासाठी सातत्याने महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
मूलचेरा तालुक्यातील मार्खडा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या विश्वनाथनगर, लक्ष्मीपूर, विजयनगर, गांधीनगर,कालीनगर, या 5 गावातील 29 अतिक्रमित बंगाली बांधव धारकांना जमिनीची मोजणी करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.मूलचेरा तालुक्यातील 22 गावात बहुसंख्य बंगाली समाजबांधव वास्तव्याने असून मागील अनेक  वर्षापासून विश्वनाथनगर, लक्ष्मीपूर, विजयनगर, गांधीनगर,कालीनगर या 5 गावातील बंगाली बांधव  वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती करत आले आहेत.
मात्र शासनाकडून त्यांना हक्काच्या सातबारा मिळाला नाही आहे संबंधित शेतकऱ्याद्वारे अतिक्रमित जमिनीचे मोजमाप करून हक्काच्या सातबारा मिळावा,यासाठी प्रशासन स्तरावर निवेदन,अर्ज सादर केले. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. पण ही बाब अतिक्रमित शेतकऱ्यांनी माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे समोर मांडली.त्यावेळी राजे साहेबांनी अतिक्रमण धारकांना हक्काची जमीन मिळावी,यासाठी सातत्याने महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आज  यश आले आहे.
शासनाने बंगाली बांधवांची मागणी मान्य करीत तालुक्यातील 5 गावातील 29 अतिक्रमण धारक शेतकऱ्यांची शेतजमिनीची मोजणी भूमि अभिलेख कार्यालयात मार्फत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.यासाठी लागणारा खर्च शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे तालुक्यातील अतिक्रमकधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->