कोरोना ने चिंता वाढवली, मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, देशभरात एका दिवसात ७५२ रुग्णांची नोंद.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

कोरोना ने चिंता वाढवली, मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, देशभरात एका दिवसात ७५२ रुग्णांची नोंद.!

दि. 24.12.2023 

Vidarbha News India 

कोरोना ने चिंता वाढवली, मंत्री धनंजय मुंडेंची चाचणी पॉझिटिव्ह, देशभरात एका दिवसात ७५२ रुग्णांची नोंद.!

विदर्भ न्यूज इंडिया 

मुंबई : कोरोना विषाणूचा नवीन उपपक्रार असलेल्या 'जेएन.१'ने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवलेली असताना देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढू लागली आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी 'जेएन.१'ने बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

केरळ, महाराष्ट्र, गोव्यासह अनेक राज्यांमध्ये जेएन.१ बाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. दरम्यान, देशात करोनाबाधित रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे की, या एका महिन्यात जगभरात ५२ टक्के करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे.

संपूर्ण भारतात शुक्रवारी (२२ डिसेंबर) दुपारपर्यंत ६४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले होते. एकट्या केरळ राज्यात २६५ करोनाबाधित रुग्ण सापडले होते. तसेच एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यूदेखील झाला होता. त्यापाठोपाठ शनिवारीदेखील देशभरात शेकडो नवे रुग्ण आढळले. देशभरात शनिवारी एका दिवसात ७५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे आणि चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३,४२० करोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहे. यापैकी ५६५ रुग्ण एकट्या केरळ राज्यात आहेत. महाराष्ट्रातही शनिवारी १९ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनादेखील करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः मुंडे यांनी फेसबूक आणि एक्सवर याबाबतची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांनी फेसबूकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी कोव्हिड-१९ तपासणी केली असता पुन्हा एकदा कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. मला सध्या फारसा त्रास नाही, परंतु, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी मागील चार दिवसांपासून क्वारन्टाईन (विलगीकरण कक्षात) राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. मी लवकरच बरा होऊन आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा दाखल होईन.

सध्या थंडीचं वातावरण असून कोव्हिडच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. त्यादृष्टीने घाबरून न जाता सर्वांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला मुंडे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये गेल्या दोन दिवसांत दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात केरळपाठोपाठ अनुक्रमे कर्नाटक, राजस्थान आणि महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण आहेत.


Share News

copylock

Post Top Ad

-->