विर बाबुराव शेडमाके यांनी देश सेवेसाठी लढले त्यांचे विचार आदिवासी समाज बांधवांनी आत्मसात करावे;- खासदार अशोक नेते - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

विर बाबुराव शेडमाके यांनी देश सेवेसाठी लढले त्यांचे विचार आदिवासी समाज बांधवांनी आत्मसात करावे;- खासदार अशोक नेते

दि. 24.12.2023 
Vidarbha News India 
विर बाबुराव शेडमाके यांनी देश सेवेसाठी लढले त्यांचे विचार आदिवासी समाज बांधवांनी आत्मसात करावे - खासदार अशोक नेते
विर बाबुराव शेडमाके व पांदि पारी कुपार लिंगो तसेच सल्ला गांगरा  यांच्या पुतळयांचे अनावरण सोहळा खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते संपन्न!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : धानोरा गोटुल समिती व गावकऱ्यांच्या वतीने  मौजा- गट्टेपायली ता.धानोरा जि.गडचिरोली येथे विर बाबुराव शेडमाके पुतळा व पांदि पारी कुपार लिंगो तसेच सल्ला गांगरा  यांच्या पुतळयांचे अनावरण सोहळा तथा समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या अनावरण पुतळयांचा सोहळा गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते फित कापुन अनावरण सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना विर बाबुराव शेडमाके यांनी देशासाठी लढले, असा विर लढवया पुरुष आपल्या समाजाच्या मातीत जन्मले याचा अभिमान वाटला पाहिजे. यासाठी त्यांचे विचार, आचार,आदिवासी समाज बांधवांनी आत्मसात करावा. यावेळी गावकऱ्यांनी सांगितलेल्या समस्या व अडी अडचणी जाणून घेत समस्यांचे निराकारण करण्याचे आश्वासित केले.
याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम यांनी चांगले सामाजिक मार्गदर्शन केले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे, अशोक नेते, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, से.नि.मेजर कान्होजी लोहंबरे, गोटुल समिती चे अध्यक्ष अशोक उसेंडी, उपाध्यक्ष सुकरु जुमनाके, सरपंच दुधराम परसे, रामदास गावंडे, काशिनाथ हिचामी,तंटामुक्ती अध्यक्ष दिवाकर बोमनवार, सोयाम साहेब, कनाके बाबुजी, गुणवंत शेंडे आरोग्य सेवक,गट ग्रा.पं.चे धनंजय, कांटेंगे जी , नगिना कुळमेथे, मिनाताई मरापे, मिनाताई जूमनाके, तसेच मोठया संख्येने आदिवासी बांधव युवक वर्ग, नागरिक उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->