'अंकित चलाख' यांचे सुयश आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

'अंकित चलाख' यांचे सुयश आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड.!

दि. 24.12.2023 
Vidarbha News India 
गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थी अंकित दिलीप चलाख यांचे सुयश आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गड़चिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठात द्वितीय वर्षात शिकणारा 'अंकित दिलीप चलाख' यांची नेपाल येथे 29 डिसेंबर ते 2 जनवरी दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात निवड झाली असून हा संघ दी.27 डिसेंबर रोजी नागपूर वरून नेपाल साठी रवाना होत आहे.
क्रिकेट सारखा खेळात अनेक खेळाडू सहभाग घेत असतात पण यामध्ये मला यश प्राप्त करने माझे मोठ भाऊ व माझ्या पाठीशी नेहमी खंभीरपणे ऊभा राहणारा मार्गदर्शक सचिनभाऊ विनायक रोहणकर यांचा मार्गदर्शन व वारंवार मदती मुळे शक्य झाले.
मला माझ्या आई वडिलानी क्रिकेट खेळण्यासाठी नेहमी साथ दिली मला या प्रवसात कोणत्या वस्तु ची कमी भासु दिली नाही माझ्या या यशाचे श्रेय मी माझ्या आई वडिल सौ. वर्षाताई दिलीप चलाख यांना देतो.
केवळ रामजी महाविद्यालयात क्रीडा प्रशिक्षक माझे प्रा. डॉ. महेश जोशी यांच्या प्रशिक्षणात आज पर्यंत विविध विद्यार्थ्यांनी विविध क्रीडाप्रकारामध्ये प्राविण्य प्राप्त केले आहे. असे अंकित चलाख यांनी मनोगत व्यक्त केले.
हिमाचल प्रदेश येथे सम्पन्न झालेल्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय टेनिस बॉल क्रिकेट संघात स्थान प्राप्त केले.
या विद्यार्थ्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागामुळे क्रिकेट खेळ गडचिरोली सारख्या ग्रामीण भागात प्रचलित होण्यास मदत मिळेल असा विश्वास संजय मानकर यांनी व्यक्त केला.
 या विद्यार्थ्याच्या निवडीबद्दल 
मा.राजकुमार कैटवास सचिव (VTBCA) मा.विक्की पेटकर सर सहसचिव (VTBCA)(मा.अनिल जी तिळके अध्यक्ष (GTBCA) आणि मा.संजय सर मानकर सचिव (GTBCA) व चलाख, रोहणकर व KHM परिवार व सर्व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.

Share News

copylock

Post Top Ad

-->