देसाईगंज - वडसा या रेल्वे स्टेशनवर 'थांबा' मंजूर; खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नांना यश.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

देसाईगंज - वडसा या रेल्वे स्टेशनवर 'थांबा' मंजूर; खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नांना यश.!

दि. 30.12.2023
Vidarbha News India 
देसाईगंज - वडसा  या रेल्वे स्टेशनवर 'थांबा' मंजूर; खासदार अशोक नेते यांच्या प्रयत्नांना यश.!
12251/12252 यशवंतपुर कोरबा वैनगंगा एक्सप्रेस देसाईगंज - वडसा रेल्वे स्टेशन थांबा मंजूर...
- लवकरच हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ होईल.
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली/देसाईगंज-वडसा : गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील एकमेव रेल्वे स्टेशन देसाईगंज (वडसा) आहे. या परिसरात मोठया प्रमाणात व्यापाऱ्यांची व प्रवाशां‌ची वर्दळ असते.
कोरोना च्या दरम्यान सुपरफास्ट व पॅसेंजर सर्वच गाडया बंद होत्या. परंतु नंतर कोरोना शिथिलतेनुसार संपुर्ण गाड्या चालू झाल्या.कोरोना च्या अगोदर कोरबा यशवंतपुरम वैनगंगा सुपरफास्ट ट्रेनचा थांबा (स्टापेजेस) देसाईगंज ( वडसा) येथे होता. परंतु कालांतराने देसाईगंज ( वडसा) येथे थांबा बंद केल्याने प्रवासी व  नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होऊन रोष व्यक्त केला जात होता.
याकरिता देसाईगंज (वडसा) या ठिकाणी अनेक दिवसांपासून ची व्यापाऱ्यांची, विद्यार्थ्यांची, नागरिक जनतेची, शेतकऱ्यांची, प्रवाशांची रेल्वे स्टेशनवर स्टापेजेस थांब्याची मागणी होती. खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिल्ली येथे वारंवार भेट घेऊन चर्चा करुन निवेदन देण्यात येत होते.यासाठी प्रयत्न सुद्धा केल्या जात होता. या केलेल्या प्रयत्नाला अखेर यश येऊन देसाईगंज (वडसा) रेल्वे स्टेशनला 12251/12252  यशवंतपुर कोरबा वैनगंगा एक्सप्रेस देसाईगंज (वडसा) रेल्वे स्टेशन थांबा देण्याची मागणी मान्य केली असून लवकरच हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ होईल अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. या स्टापेजेस थांब्यामुळे निश्चितच या क्षेत्रातील व्यापारी, व्यावसायिकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, जनतेला, प्रवाशांना याचा फायदा होईल.
असे वक्तव्य खासदार अशोक नेते यांनी करत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे थांबा मंजूर केल्याने आभार व  हार्दिक अभिनंदन केले.

Share News

copylock

Post Top Ad

-->