दि. ०६.१२.२०२३
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व समाजाला कायम प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व; आ. डॉ. देवराव होळी.!
- चामोर्शी येथील आंबेडकर वार्डातील बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले अभिवादन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला ६७ वर्ष झाली असून अनेक शतके स्मरणात राहतील अशा व्यक्तिमत्वाचे बाबासाहेब धनी होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असणारे बाबासाहेब हे सर्व समाजाला कायम प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतांना केले.
बाबासाहेब आंबेडकर हे जगमान्य व्यक्तिमत्व संपूर्ण जगामध्ये आजही त्यांचे विचार कायम अस्तित्वात असुन त्यांच्या विचाराचा जगभर आदर व सन्मान केला जातो. शोषित वंचितांना लढण्याचे बळ देऊन सन्मानाने जीवन जगण्याची प्रेरणा देणारे बाबासाहेब हे महान व्यक्तिमत्व असल्याचे आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले.