दि. ०९.१२.२०२३
Vidarbha News India
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या ईमारत बांधकामाचे १० डिसेंबर रोजी भूमीपूजन.!
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली कार्यालयाकरीता मौजा सोनापुर कॉम्प्लेक्स, विश्राम भवन जवळ, गडचिरोली येथे ३३००० स्केअर फुट इतका भुखंड शासनाकडून मिळाला आहे. सदर जागेवर इमारत बांधकाम करण्याकरीता अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रयत्नाने ७ कोटी अनुदान शासनाकडुन मंजुर झाले आहे.
या इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते १० डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून खासदार अशोक नेते तर विशेष अतिथी म्हणून आमदार रामदास आंबटकर, सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, आ. डॉ.देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त अभिमन्यु काळे, जिल्ह्याधिकारी संजय मिना, पोलिस अधीक्षक, निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आदी उपस्थित राहतील.
रविवार दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता संपन्न होत असलेल्या या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त अभय देशपांडे यांनी केले आहे.