दि. ९ डिसेंबर २०२३
पंतप्रधान मोदीच्या नेतृत्वात भारत विकसित देश म्हणून नावारूपास : आ. डॉ. देवराव होळी
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील काटली येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले उद्घाटन...
गावातून पदयात्रा, शपथ, सांस्कृतिक कार्यक्रम, भारत संकल्प यात्रेच्या रथाला हिरवी झंडी, अशा विविध कार्यक्रमांचे उत्तम आयोजन...
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकसित देश म्हणून नावारूपास येत असून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये विविध कार्यक्रमांच्या रूपाने राष्ट्र जागरणाचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली तालुक्यातील काटली येथील विकसित भारत संकल्प यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
याप्रसंगी मंचावर गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास दशमुखे, पंचायत समितीचे दर्शन घरविते, सरपंच अरुण उंदीरवाडे उपसरपंच पार्वताबाई खेडेकर पोलीस पाटील कृष्णकांत मुंगाटे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाला आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी हिरवी झंडी दाखवून रवाना केले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थितांकडून आत्मनिर्भर भारताची व विकसित भारताची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.