दि. ०९.१२.२०२३
Vidarbha News India
राज्याला नव्या वर्षात नवीन मुख्यमंत्री मिळेल.!
विदर्भ न्यूज इंडिया
प्रतिनिधी/नागपूर : नागपुरात होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे वादळी ठरते. कधी राजकीय आरोप, प्रत्यारोपांमुळे तर कधी पक्षातील फूट यासाठी कारणीभूत ठरते. ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये अधिवेशनाला सुरूवात झाली आहे.
राज्यातील सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाकयुद्ध सुरू असताना राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. राज्याला नव्या वर्षात नवीन मुख्यमंत्री मिळेल आणि तो महाविकास आघाडीचाच असेल, असा दावा त्यांनी माध्यमांशी बोलतांना केला आहे.
ते माध्यमांशी बोलतांना संभाव्य विधानसभा निवडणुकांचाही संदर्भ ते म्हणाले, ‘पुढील वर्षी महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल, असा दावा त्यांनी केला. पुढील वर्षी मुख्यमंत्री बदलतील आणि पुढचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच असेल’ असे थोरात म्हणाले. दरम्यान, येत्या नवीन वर्षात राज्यात मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत. त्यात राज्याला नव्या वर्षात नवीन मुख्यमंत्री मिळेल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.