गडचिरोली : अनाेळखी युवतीची गळा दाबून हत्या, पाेर्ला जंगलातील घटना.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली : अनाेळखी युवतीची गळा दाबून हत्या, पाेर्ला जंगलातील घटना.!

दि. 22.12.2023 

Vidarbha News Inda 

गडचिरोली : अनाेळखी युवतीची गळा दाबून हत्या, पाेर्ला जंगलातील घटना.!

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील पाेर्ला-वडधा मार्गावर पाेर्लापासून दीड किमी अंतरावर जंगलात एका अनाेळखी युवतीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. प्रियकराने गळा दाबून तसेच डाेक्यावर वार करून हत्या केली असल्याचा अंदाज आहे.

सदर घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली असावी.

पाेर्ला येथे राेजगार हमी याेजनेचे काम सुरू आहे. कामावर जाणाऱ्या मजुरांना युवतीचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत आढळून आला. याबाबतची माहिती पाेलिसांना दिली असता, पाेलिसांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा केला. युवक व युवती हे दाेघेही जंगलात गेले असावेत. युवतीचा खून करण्याचा निश्चय तरुणाने केला असावा. मात्र, ही बाब युवतीला कळू दिली नाही. घटनास्थळी गेल्यानंतर दाेघांमध्ये वाद झाला असावा. या वादादरम्यान युवकाने युवतीचा गळा दाबून हत्या केली. एवढ्यावरच ताे थांबला नाही तर दगडाने तिच्या डाेक्यावर वार केला. युवती बेशुद्ध पडल्यानंतर त्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला असण्याची शक्यता घटनास्थळावरील स्थितीवरून दिसून येते. मृत युवतीची ओळख पटविण्याचे काम गडचिराेली पाेलिसांमार्फत सुरू आहे.


Share News

copylock

Post Top Ad

-->