दि. 21.12.2023
मार्कंडा देव ते फोकुर्डी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामाची आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली पाहणी
- ॲन्युल मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट च्या माध्यमातून रस्त्याचे खड्डे कशाप्रकारे बुजवल्या जातात त्याची केली पाहणी
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : वर्षभर पडणारे रस्त्यांवरील खड्डे ॲन्युल मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट (AMC) च्या माध्यमातून कशाप्रकारे बुजवल्या जातात याची प्रत्यक्ष पाहणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आज मार्कंडादेव ते फोकुर्डी कडे जाणाऱ्या रस्त्यावर जावून केली.
यावेळी भाजपा जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, बंगाली आघाडी जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश शहा, प्रतीक राठी भोजराज भगत यांचे सह बांधकाम विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मार्कंडादेव ते फोकुर्डी कडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने स्थानिकांनी खड्डे बुजवण्याची सातत्याने मागणी केली होती त्या अनुषंगाने आमदार डॉ. देवराव होळी यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देऊन तातडीने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने सदर काम सुरू झाले असून लवकरच सदर काम पूर्ण केले जाणार आहेत.