दि. 25.12.2023
गोंडवाना विद्यापीठाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे उद्घाटन.!
आव्हान शिबिरात विद्यार्थ्यांनी समर्पणाने सहभागी व्हावे : राज्यपाल रमेश बैस
विदर्भ न्यूज इंडिया
गडचिरोली : गेल्या काही वर्षांत, भारताने आपत्तींना प्रतिसाद देण्यामध्ये, विशेषत : आपत्तीपूर्व शमनामध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. सरकार सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आपत्ती व्यवस्थापनात विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विद्यार्थी आपत्ती बाबत जागरूकता पसरविण्यात मदत करू शकतात.
आपत्तीसाठी तयार राहण्याच्या महत्त्वाबद्दल ते त्यांचे मित्र, कुटुंब आणि समुदाय सदस्यांना महत्त्वाचे संदेश देऊ शकतात.
सामूहिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये स्वभावाने मोठे धैर्य आणि तग धरण्याची क्षमता असते. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे समाजाला मोठ्या गरजेच्या वेळी खूप मदत होते. विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे प्रशिक्षण दिल्यास, ते आपत्तीस्थळी पोहोचू शकतात आणि पूर, भूकंप, दुष्काळ इत्यादी वेळी आपत्ती व्यवस्थापन पथकाला त्वरित पुनर्वसनासाठी मदत करू शकतात. हे लक्षात घेऊन कुलपती कार्यालयाने सुरू केलेल्या कार्यक्रमांच्या मालिकेत 'आव्हान' ही अतिशय महत्त्वाचा उपक्रम म्हणून पुढे आला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये समाजाला घडवण्याची क्षमता आणि आपत्तींसारख्या देशासमोरील प्रत्येक आव्हानाशी लढण्याची हिंमत असण्याचे स्वप्न माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले असल्याने, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, प्रत्येक आपत्तीतून भारत सुरक्षित आणि विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आव्हान शिबिरात विद्यार्थ्यांनी पूर्ण समर्पणाने सहभागी व्हावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यस्थानावरून बोलताना आज केले. यावेळी ते दूरस्थ पध्दतीने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनापूर्वी आव्हानच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
या उद्घाटन समारंभा प्रसंगी मंचावर खासदार अशोक नेते, पोलीस अधीक्षक निलोत्पल, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, आमदार कृष्णा गजबे, जळगाव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनोद पाटील, स. समादेशक राष्ट्रीय आपदा मोचनबल प्रवीण धट ,सिनिअर इन्स्पेक्टर एन. डी.आर. एफ. कृपाल मुळे अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान डॉ.अनिल चिताडे, अधिष्ठाता मानव विज्ञान विद्याशाखा डॉ. चंद्रमौली, वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे,गोंडवाना विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे, कोल्हापूर विद्यापीठाचे रासेयो संचालक तानाजी चौगुले, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरुदास कामडी,प्रशांत मोहिते, प्रा.डॉ. विवेक जोशी, गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा संचालक डॉ. दिनेश नरोटे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, मी गोंडवाना विद्यापीठ आणि सर्व सहभागी राष्ट्रीय स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी यांचे अभिनंदन करतो कारण त्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर सुरू केले आणि त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळावे अशी शुभेच्छा व्यक्त करतो.
विद्यापीठाच्या वतीने स. प्रा.डॉ. मनीष देशपांडे आणि कृष्णा देवईकर यांनी राजभवनात जाऊन त्यांचे स्वागत केले.
या प्रसंगी खासदार अशोक नेते म्हणाले, विद्यापीठाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर आयोजित केले त्यासाठी मी विद्यापीठाचे अभिनंदन करतो व अशा प्रकारच्या शिबिरामुळे येथिल विद्यार्थ्यांना फायदा होईल. जिल्ह्यात दरवर्षी येणाऱ्या पूर परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी सहभागी होता येईल असे ते म्हणाले.
या प्रसंगी पोलीस अधिक्षक निलोत्पल म्हणाले,
विद्यापीठाने अत्यंत चांगल्या प्रकारे आव्हान चे आयोजन केले आहे, मी त्यांचे अभिनंदन करतो,
गडचिरोली मध्ये दरवर्षी नैसर्गिक आपत्ती येते, त्याअनुषंगाने पुढील 10 दिवस प्रशिक्षण होणार आहे, ते महत्वाचे आहे, बारकाईने प्रशिक्षण करा, तुमचे प्रशिक्षण अमूल्य ठरणार आहे,
आमदार कृष्णा गजबे
राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा महत्वाचा दुवा आहे, not me but u हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य आहे, राष्ट्र उभारणीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेने नेहमी पुढाकार घेत आपले सर्व कौशल्य वापरून लोकांचे जीव वाचवावे ही रासेयो च्या 'आव्हान' ची संकल्पना आहे, मी सुद्धा रासेयो चा स्वयंसेवक राहिलो आहे, आव्हान च्या माध्यमातून एक विद्यार्थी म्हणून आज उभा आहे, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्व संकट पेलून नेण्याची शक्ती आपल्याला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे,
आपदा प्रबंधनाचे प्रमुख कारण हे मानवनिर्मित असते. याचा नीट मुकाबला करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण देण्याची गरज असते. आपदा प्रबंधनाचे धडे हे सामान्य नागरिकांना दिले तर जीवित आणि वित्त होणार नाही .दहा दिवस होणाऱ्या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी चांगला उपयोग करून घ्यायचा आहे. यातून प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी त्यांच्या जिल्ह्यात पाठवण्यात येणार आहे. आपल्यातील जोश, उत्साह अतिशय महत्त्वाचा आहे. मी राजभावनाचे आभार मानतो की, त्यांच्या कार्यालयाकडून अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या दहा दिवसाच्या प्रशिक्षणातून आपण आपल्या जिल्ह्यात जाऊन आपत्ती व्यवस्थापनाचे काम कराल आणि त्याचा फायदा समजला होईल अशी आशा व्यक्त करतो
कार्यक्रमात राष्ट्रीय आपदा मोचन बल बलाचे सहाय्यक समादेशक प्रवीण धट यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. श्याम खंडारे यांनी केले संचालन डॉ. शिल्पा आठवले यांनी तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह समन्वयक डॉ.प्रिया गेडाम यांच्यासह विद्यापीठातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.