सामाजिक कार्याची परंपरा जोपासावी : खासदार अशोक नेते - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

सामाजिक कार्याची परंपरा जोपासावी : खासदार अशोक नेते

दि. 26.12.2023

Vidarbha News India 
सामाजिक कार्याची परंपरा जोपासावी : खासदार अशोक नेते 
- "यशवंतराव चव्हाण" आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार व वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबीयांना मदत
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : आज भगवान दतात्रेय ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या अवताराने दत्त जयंतीचे औचित्य साधुन दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह सहकारी बँकेच्या वतीने "यशवंतराव चव्हाण" आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार प्राप्त मान.आमदार कृष्णाजी गजबे यांचे अभिनंदनपर व वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटूंबियांना मदतीचा हात या कार्यक्रमाचे आयोजन दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती को-ऑपरेटिव्ह सहकारी बँकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना पोरड़्डीवार परिवार हा नेहमीच सामाजिक कार्याचे उपक्रम घेत असतो. सामाजिक कार्याची जाणीव ठेवून सामाजिक कार्याची परंपरा जोपासून हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचा अभिनंदन करून कौतुक करतो. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना एक मदतीचा आधार व  त्यांच्या दुःखात सामील होऊन त्यांचा दुःख हलके करण्याचा व वाटून घेत त्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली.अतिशय चांगला कौतुकास्पद कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच संयमी, शांत प्रेमळ स्वभावाचे धनी,चांगले व्यक्तिमत्व असलेले आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार कृष्णाजी गजबे यांना यशवंतराव चव्हाण आदर्श लोकप्रतिनिधी , पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचंही सुद्धा याप्रसंगी अभिनंदन करतो.आज प्रंचित सा.पोरड़्डीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्याच्या शुभेच्छा व समस्त जनतेला दत्त जयंतीच्या शुभेच्छा देतो असे प्रतिपादन याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने मान.आमदार श्री.रामदासजी आंबटकर वि.प.सदस्य,सहकार महर्षी अरविंद साव.पोरेड़्डीवार, सहकार नेते प्रकाश साव. पोरेड़्डीवार,आमदार कृष्णाजी गजबे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, अध्यक्ष GDCC बँक गडचिरोली चे प्रंचित साव. पोरेड़्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार,मानद सचिव अनंत साळवे,नगराध्यक्ष पवन नारनवरे,कृ.उ.बा.स. आरमोरी सभापती ईश्वर पासेवार, कृ.उ.बा.स.गडचिरोली सभापती शशिकांत साळवे, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,डाॅ.अप्पलवार तसेच मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->