एन. डी. आर. एफ. च्या चमू कडून विद्यार्थ्यांनी समजून घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे कौशल्य.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

एन. डी. आर. एफ. च्या चमू कडून विद्यार्थ्यांनी समजून घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे कौशल्य.!

दि. 26.12.2023 
Vidarbha News India 
एन. डी. आर. एफ. च्या चमू कडून विद्यार्थ्यांनी समजून घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे कौशल्य.!
विदर्भ न्यूज इंडिया 
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर 'आव्हान २०२३' चे उद्घाटन काल पार पडले. उदघाटन कार्यक्रमानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या(महाराष्ट्र) चमु ने राज्यभरातील विद्यापीठातुन आलेल्या विद्यार्थ्यांना एन. डी. आर. एफ. ची प्राथमिक माहिती दिली. चार वेगवेगळ्या ठिकाणी या प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एन. डी.आर. एफ. ची स्थापना कशासाठी करण्यात आली, त्याचे कार्य काय, कशा प्रकारे हे कार्य केले जाते, कुठल्या आपत्ती मध्ये कशा प्रकारे मदत केली जाते. याची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. एन.डी.आर. एफ. च्या महाराष्ट्र चमूने ने ही माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा एन. डी.आर. एफ. च्या चमूने दिली. आजपासून प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गाला सुरवात झाली.
शहरातील सुमानंद, गांडली, सुप्रभात सभागृह, शासकीय विज्ञान महाविद्यालय येथे विविध विद्यापीठातून आलेल्या विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली आहे. आज या चारही ठिकाणी एन. डी.आर. एफ. च्या चमूने 
प्रशिक्षण दिले. यामध्ये सकाळी पी. टी. आणि योगाचे प्रशिक्षण देण्यात आले.त्यानंतर 'आपत्ती व्यवस्थापन 'या विषयावर सिनियर इन्स्पेक्टर एन. डी.आर. एफ. कृपाल मुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुठल्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी 'हृदयाला पुनर्जीवित कसं करायचं' आणि ऑक्सीजन थेरपी या विषयावर हेड कॉन्स्टेबल एन.डी.आर. एफ.  
गणेश देशमुख यांनी पी. पी. टी. व्दारे माहिती दिली. तसेच याच विषयावर प्रात्याक्षिक कॉन्स्टेबल  एन. डी.आर. एफ. सदाशिव जायभाये यांनी दिले.
शासकीय विज्ञान महाविद्यालयात पार पडलेल्या या प्रशिक्षण वर्गात विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांचे निरसन एन. डी.आर. एफ.
अधिकाऱ्यांनी केले. आपत्तीच्या समयी समयसूचकता राखून कशी  काळजी घेता येईल हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थी प्रचंड उत्साही होते.

Share News

copylock

Post Top Ad

-->