दि. 04.12.2023
Vidarbha News India
Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; या मुद्द्यांवर होणार चर्चा.!
विदर्भ न्यूज इंडिया
दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. विधानसभा निवडणूकांमध्ये चार राज्यांच्या निकालानंतर आज दुसऱ्याच दिवशी होत असलेल्या अधिवेशनाकडं सर्वांच लक्ष लागले आहे.
आज (सोमवार) सकाळी 10.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या बाहेरून अधिवेशन सुरळीत पार पडाव यासाठी संबोधित करणार आहेत. दरम्यान आज पहिल्याच दिवशी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील संसदेत प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाचा एथिक्स कमिटीचा रिपोर्ट अध्यक्षांसमोर सादर केला जाणार आहे.
संसदेच्या 19 दिवसांच्या या अधिवेशनात 15 बैठका होणार असून 37 विधेयके मांडली जाणार आहेत. IPC, CrPC आणि एविडेंस अॅक्ट यात बदल करणारी तीन विधेयक अधिवेशनात पारीत होण्याची शक्यता देखील आहे. पावसाळी अधिवेशनावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी ती लोकसभेत मांडत स्टॅडींग कमिटीकडे पाठवली होती. अनेक मिटिंग नंतर 10 नोव्हेंबरला कमिटीने आपला रिपोर्ट सादर केला होता.
या सोबतच मुख्य निवडणुक आयुक्त आणि बाकी निवडणुक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात देखील विधेयक मांडले जाणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची अधिवेशनातील रणणीती बाबत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात बैठक होणार आहे.