गडचिरोली : पोर्ला जंगल परिसरातील निर्घुन हत्येचा पर्दाफास.! - VIDARBHA NEWS INDIA

Breaking

VIDARBHA NEWS INDIA

VNI - विदर्भ न्यूज इंडिया ( विदर्भासह देशभरातील घडामोडी )



Happy New Year 2024

इथे जाहिरात करा प्रसिद्धी मिळवा...जाहिरातीसाठी संपर्क : 8208600591 / info.media.vni@gmail.com

Advertise

गडचिरोली : पोर्ला जंगल परिसरातील निर्घुन हत्येचा पर्दाफास.!

दि. 23.12.2023 

Vidarbha News India 

गडचिरोली : पोर्ला जंगल परिसरातील निर्घुन हत्येचा पर्दाफास.!

Gadchiroli Crime News :

विदर्भ न्यूज इंडिया 

गडचिरोली : पोर्ला-वडधा मार्गावरील जंगल परिसरात गुरुवारी (ता. 21 डिसेंबर) एका अनोळखी मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र या मुलीच्या हत्येतील आरोपीस अवघ्या 24 तासात पोलिसांनी जेरबंद केले असून या घटनेचा पर्दाफास केला आहे.adchiroli Crime News : पोर्ला-वडधा मार्गावरील जंगल परिसरात गुरुवारी (ता. 21 डिसेंबर) एका अनोळखी मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र या मुलीच्या हत्येतील आरोपीस अवघ्या 24 तासात पोलिसांनी जेरबंद केले असून या घटनेचा पर्दाफास केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, येथील पोर्ला-वडधा मार्गावरील जगल परिसरात एका अनोळखी अर्धनग्न मुलीचे प्रेत सापडल्याने तिची ओळख पटविणे व या प्रकरणाचा छडा लावणे पोलिसांपूढे मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी आपली तपास यंत्रणा कामाला लावून या खुनाच्या प्रकरणातील आरोपी निखील मोहुर्ले याला ताब्यात घेतले आहे. आरोपी निखिल मोहूर्ले हा वैरागड येथील रहिवासी असून त्याचे सदर मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली.

आता या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देवून पाहाणी केली. श्‍वान पथक तसेच अंगुलीमुद्रा विभागातील अधिकारी यांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. परंतु, मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाकरीता चार तपास पथक तयार करून स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांना मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकिस आणण्याची विशेष जबाबदारी सोपविली होती.

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वैरागड येथून निखील मोहुर्ले यांस ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, त्यास अधिक विश्‍वासात घेवून सखोल विचारपूस केली असता त्याने या प्रकरणाबाबत माहिती दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपी निखील मोहर्ले याला ताब्यात घेतले आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलिस अधीक्षक कुमार चिता यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड, पोउपनि निलेशकुमार वाघ, श्रीकांत बोईना, प्रशांत गरफडे, क्रिष्णा परचाके, दिपक लोणारे, माणिक निसार, माणिक दुधबळे, सतिष कतीवार, मनोहर तोगरवार तसेच पोलिस स्टेशन गडचिरोली येथील पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, मपोउपनि विशाखा म्हेत्रे, भाऊराव बोरकर व इतर अंमलदार यांनी केली आहे.


Share News

copylock

Post Top Ad

-->